मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मध्यरात्री ३ वाजता आमदार यड्रावकरांच्या निवासस्थानी | पुढारी

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मध्यरात्री ३ वाजता आमदार यड्रावकरांच्या निवासस्थानी

जयसिंगपूर : संतोष बामणे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (शनिवार) कोल्हापूर येथे हातकणंगले व कोल्हापूर लोकसभा निवडणुकीच्या जोडण्यांसाठी आले होते. दरम्यान रात्री उशिरापर्यंत आमदार व वरिष्ठ कार्यकर्ते यांची त्‍यांनी भेट घेतली होती. त्यानंतर मध्यरात्री तीन वाजता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गाडीचा ताफा जयसिंगपूर येथे आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या निवासस्थानी दाखल झाला. आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर, जयसिंगपूरचे माजी नगराध्यक्ष संजय पाटील यड्रावकर यांना शिरोळ व हातकणंगले तालुक्यातील निवडणुकीची जबाबदारी दिली.

शनिवारी सायंकाळी आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर व संजय पाटील यड्रावकर यांनी कोल्हापूर येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन चर्चा केली होती. अशातच शनिवारी मध्यरात्री तीन वाजता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या निवासस्थानी दाखल झाले. मध्यरात्री तीन वाजता आलेले मुख्यमंत्री पहाटे पाच वाजता रवाना झाले. सुमारे दोन तास ते या ठिकाणी होते. शिरोळ व हातकणंगले तालुक्यातील लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी ही आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्यावर देण्यात आली आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे नेते एकसंघ आहे. सर्वांनी एकत्र येऊन हातकणंगले लोकसभा मतदारसंघात नियोजन करा. गापील राहू नका. पूर्ण ताकतीने आपला विजय होणार आहे. त्यामुळे शिरोळ आणि हातकणंगले तालुक्याची जबाबदारी घेऊन सर्वाधिक मताने धैर्यशील माने यांना निवडून आना असे आदेश आमदार राजेंद्र पाटील यांना दिला.
यावेळी खासदार धैर्यशील माने, जयसिंगपूरचे माजी नगराध्यक्ष संजय पाटील यड्रावकर, शरद कारखान्याचे संचालक आदित्य पाटील यड्रावकर, यड्राव बँकेचे चेअरमन अजय पाटील यड्रावकर यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

हेही वाचा : 

Back to top button