कोल्हापूर : शिक्षक बँकेचे 17 माजी संचालक 6 वर्षांसाठी अपात्र

file photo
file photo

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : बेकायदेशीर आणि नियमबाह्य नोकरभरतीप्रकरणी प्राथमिक शिक्षक बँकेच्या 17 माजी संचालकांना पुढील सहा वर्षांसाठी निवडणूक लढविण्यास अपात्र ठरविले आहे. याबाबत जिल्हा उपनिबंधक निलकंठ करे यांनी तशा नोटिसा बजावल्या आहेत. यासंदर्भात म्हणणे सादर करण्यासाठी 22 एप्रिल रोजी दु. 4 वा. सुनावणी ठेवण्यात आली आहे.

तत्कालीन चेअरमन साहेब शेख, व्हाईस चेअरमन सौ. स्मिता डिग्रजे, संचालक शिवाजी पाटील, संभाजी बापट, बजरंग लगारे, राजमोहन पाटील, नामदेव रेपे, आण्णासो शिरगावे, जी. एस. पाटील, दिलीप पाटील, अरुण पाटील, प्रसाद पाटील, डी. जी. पाटील, बाजीराव कांबळे, प्रशांतकुमार पोतदार, सुरेश कोळी, लक्ष्मी पाटील अशी नोटिसा पाठविण्यात आलेल्या माजी संचालकांची नावे आहेत.

रिझर्व्ह बँकेच्या नियमानुसार या बँकेचे कामकाज चालते. माजी संचालकांनी मे 2019 मध्ये 30 कर्मचार्‍यांची भरती केली. सहकार आयुक्त कार्यालयाने ज्या संस्थेला नोकर भरतीची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी मान्यता दिली आहे, त्यांच्याकडूनच भरती प्रक्रिया करून घेणे आवश्यक होते. पण या माजी संचालकांनी ही प्रक्रिया पार पाडली नाही. तसेच पन्हाळा शाखेला मंजुरी नसतानाही ती शाखा दाखवून 9 कर्मचार्‍यांची भरती करण्यात आली. यावरून बँकेच्या तत्कालीन संचालकांनी नोकरभरती करत असताना सहकार खात्याच्या निर्देशांचे व त्यातील कार्यपद्धतीचे पालन केले नसल्याचे शासनाच्या निदर्शनास आले आहे. यामुळे सहकार विभागाने माजी संचालकांना दोषी ठरवून त्यांना पुढील सहा वर्षांसाठी निवडणूक लढविण्यास अपात्र ठरविण्यात येत आहे. याबाबत म्हणणे सादर करण्यासाठी जिल्हा उपनिबंधक कार्यालयात सुनावणी ठेवण्यात आली आहे.

विद्यमान संचालक सुरेश कोळी अपात्र ठरणार

बँकेच्या विद्यमान संचालक मंडळात सुरेश कोळी आहेत. कोळी हे मागील संचालक मंडळातही होते. त्यामुळे ते या प्रकरणात दोषी ठरत असून त्यांच्यावरही अपात्रतेची कारवाई होण्याची शक्यता आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news