निम्म्या कोल्हापुरात शुक्रवार, शनिवारी पाणी पुरवठा बंद

निम्म्या कोल्हापुरात शुक्रवार, शनिवारी पाणी पुरवठा बंद

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : पुईखडी जल शुद्धीकरण केंद्राकडून आयटीआय कॉर्नर व निर्मिती कॉर्नर पाचगाव रोड या ठिकाणी जाणार्‍या जलवाहिनीच्या क्रॉस कनेक्शनचे काम शुक्रवारी व शनिवारी (दि. 5 व 6) करण्यात येणार आहे. परिणामी पुईखडी जल शुद्धीकरण केंद्रातून होणारा पाणी पुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे शहरातील शिवाजी पेठ, मंगळवार पेठ, ए व बी वॉर्डसह त्या परिसरातील पाणीपुरवठा शुक्रवारी व शनिवारी बंद राहणार आहे. तसेच रविवारी (दि. 7) अपुरा व कमी दाबाने पुरवठा होणार आहे.

ए, बी वॉर्डमधील कळंबा जेल समोर, वसंत विश्वास पार्क, एलआयसी कॉलनी, बाबूराव साळोखे पार्क, तपोवन परिसर, म्हाडा कॉलनी, सोमराज कॉम्प्लेक्स, नाळे कॉलनी, विद्या विहार कॉलनी, जुनी मोरे कॉलनी, संभाजीनगर एस.टी. स्टँड परिसर, नवीन मोरे कॉलनी, जोशीनगर, विजयनगर, शहाजी वसाहत, संभाजीनगर, कोल्हापूर सॉ मिल परिसर, गंजीमाळ, रामानंदनगर, जरगनगर, रेणुकानगर, आर.के. नगर, गणेश कॉलनी, हुनमाननगर, जोतिर्लिंग कॉलनी, रायगड कॉलनी, हॉकी स्टेडियम परिसर, बालाजी पार्क, यशवंत कमल पार्क, जाधवनगर, भारत नगर, सौदानगर, सुभाषनगर, वाय. पी. पोवार नगर, मंगळवार पेठ, वारे वसाहत, शाहू बँक, राम गल्ली, मंगेशकर नगर, बेलबाग, मंडलिक वसाहत, पाटाकडील तालीम, बजापराव तालीम, जासूद गल्ली, कोळेकर तिकटी, पोवार गल्ली, शिवाजी पेठ, वेताळ माळ तालीम, 8 नंबर शाळा, फिरंगाई गल्ली, टिंबर मार्केट, कोंडेकर गल्ली, सरदार तालीम परिसर, शहाजी वसाहत परिसर या भागात पाणीपुरवठा होऊ शकणार नाही. नागरिकांनी उपलब्ध पाणी काटकसरीने वापरून सहकार्य करावे, असे आवाहन महापालिकेने पत्रकाद्वारे केले आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news