कोल्हापूरची अस्मिता दिल्लीला पाठवा : सतेज पाटील

कोल्हापूरची अस्मिता दिल्लीला पाठवा : सतेज पाटील
Published on
Updated on

कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा : शाहू महाराज यांना चांगला प्रतिसाद आहे. गावागावात उत्साहाचे वातावरण आहे. त्याचे मतांमध्ये रूपांतर करण्यासाठी आपण परिश्रम घेतले पाहिजे. वेळ कमी आहे. कोल्हापूरच्या स्वाभिमानाचा शिवधनुष्य आपण उचललेला असून. कोल्हापूरच्या मातीची अस्मिता दिल्लीत प्रचंड मताधिक्याने पोहोचवावी, असे आवाहन काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आ. सतेज पाटील यांनी बुधवारी केले.

महाविकास आघाडीचे उमेदवार शाहू महाराज यांच्या छत्रपती शिवाजी स्टेडियम येथील मध्यवर्ती प्रचार कार्यालयाचे उद्घाटन कामगार चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्ते बी. एल. बरगे यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी आ. पाटील बोलत होते. यावेळी शाहू महाराज, आ. जयश्री जाधव, आ. ऋतुराज पाटील आदी उपस्थित होते.
व्हॉटस्अ‍ॅपवर कार्यकर्त्यांना शाहू महाराज यांचा दौरा टाकला जाईल. ज्या ठिकाणी दौरा असेल तेथील स्थानिक कार्यकर्त्यांनी निमंत्रणाची वाट न पाहता घरचे काम आहे, असे समजून त्याठिकाणी प्रचारात सहभागी व्हायचे आहे. गुरुवारी (दि.28) शाहू महाराज यांचा डीपी आपण प्रसिद्ध करतोय तो सर्वांनी निवडणूक होईपर्यंत आपल्या मोबाईलवर लावावा, असेही आ. पाटील म्हणाले.

कार्यक्रमास माकपचे प्रदेश सचिव उदय नारकर, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष व्ही. बी. पाटील, शहराध्यक्ष आर. के. पोवार, शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख संजय पवार, सहसंपर्क प्रमुख विजय देवणे, माकपचे चंद्रकांत यादव, डॉ. सुभाष जाधव, भाकपचे जिल्हा सेक्रेटरी सतिशचंद्र कांबळे, गोकुळचे माजी अध्यक्ष विश्वास पाटील, दिलीप पवार, शिवाजीराव परुळेकर, डॉ. टी. एस. पाटील, संभाजीराव जगदाळे, काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन चव्हाण, महिला काँग्रेस शहर अध्यक्ष संध्या घोटणे, सुलोचना नाईकवडे, सरलाताई पाटील आदी उपस्थित होते.

सोशल मिडियाच्या माध्यमातून जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचा

सोशल मिडियाच्या माध्यमातून जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचण्याचा प्रयत्न करावा. निवडणूक होईपर्यंत काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मला, शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी देवणे व पवार यांना दिसला नाही तरी चालेल पण मतदानाच्या दिवसापर्यंत आपापल्या भागात प्रचार करा. कार्यकर्त्यांना काही अडचण असल्यास मध्यवर्ती ठिकाण म्हणून हे प्रचार कार्यालय सुरू करण्यात आले आहे. याठिकाणी शाहू महाराज देखील दौर्‍यातून वेळ मिळाला की थोडा वेळ थांबतील, असेही आ. पाटील म्हणाले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news