तिलारी काॅन्झर्वेशन रिझर्व्ह’मध्ये पट्टेरी वाघाने केली शिकार

तिलारी काॅन्झर्वेशन रिझर्व्ह’मध्ये पट्टेरी वाघाने केली शिकार
Published on
Updated on

तिलारी संवर्धन राखीव, चंदगड संवर्धन राखीव, दोडामार्ग आंबोली संवर्धन राखीव, छत्रपती शाहू महाराज आजरा-बुदरगड संवर्धन राखीव, गगनबावडा संवर्धन राखीव, पन्हाळगड संवर्धन राखीव विशाळगड संवर्धन राखीव, हा भाग राधानगरी वन्यजीव अभयारण्याला लागून आहेत. तर एकीकडे सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या चांदोली राष्ट्रीय उद्यान व कोयना अभयारण्य व पुढे जोर जांभळी संवर्धन राखीव पर्यंत सलग लागून आहेत.  भ्रमणमार्ग अखंड ठेवल्याने प्रजनन क्षेत्रातील वाघ व इतर तरून भक्षी प्राणी हे या क्षेत्राला जोडणाऱ्या इतर जंगलात आणि संरक्षित वन क्षेत्रात स्वत:चा स्वतंत्र अधिवास निर्माण करु शकतात हे अधोरेखित होते.

-डॉ. व्ही. क्लेमेंट बेन भा.व.से.
मुख्य वनसंरक्षक -कोल्हापूर

कोयना वन्यजीव अभयारण्य, चांदोली राष्ट्रीय उद्यान आणि राधानगरी वन्यजीव अभयारण्य यांना युनेस्कोने जागतिक नैसर्गिक वारसा स्थळे म्हणून घोषित केले आहेत आणि बर्डलाइफ इंटरनॅशनलने महत्त्वाचे पक्षी क्षेत्र म्हणून घोषित केले आहे, हे जगातील जैवविविधतेने समृद्ध असे महत्वाचे स्थान ठरले आहे. लवकरच लुप्त होण्याच्या धोका असलेल्या व केवळ याच भागात आढळणाऱ्या वनस्पती, प्राणी, पक्षी, व इतर प्रजाती यांनी हा प्रदेश समृद्ध आहे. ही वस्तुस्थिती लक्षात घेता सह्याद्री व्याघ्र प्रकल्पासाठी विशेष व्याघ्र संरक्षण दलाची ( स्पेशल टायगर प्रोटेक्शन फोर्स ) मंजूरी खूप दिवसांपासून प्रलंबित आहे. म्हत्वाचे म्हणजे राज्यात व भारतात इतर सर्व व्याघ्र प्रकल्पात स्पेशल टायगर प्रोटेक्शन फोर्स मंजूर व त्तैनात आहे. सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात विशेष व्याघ्र संरक्षण दलाची तैनाती लवकरात लवकर शासनाने करावी आणि संपूर्ण प्रदेश विशेष वाघ संरक्षण दलाच्या संरक्षण आणि रक्षणाखाली आणल्यास वन्यजीव गुन्हेगारी आणि बेकायदेशीर बॉक्साईट खाणकाम नियंत्रित करण्यात मोठी मदत होईल तर स्थानिकांना व्याघ्र संरक्षण दलात नोकऱ्या मिळतील.

-रोहन भाटे
मानद वन्यजीव रक्षक सातारा तथा,
सदस्य वन्यजीव अपराध नियंत्रण बुरो

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news