कोल्हापूर ; पुढारी वृत्तसेवा : कोल्हापूर स्थानकातून सुटणार्या एक्स्प्रेस दोन महिने फुल्ल आहेत. विशेष म्हणजे पर्यटन हंगाम सुरू होण्यापूर्वीच प्रमुख रेल्वेगाड्यांचे बहुतांशी सर्व तिकिटांचे बुकिंग झाले आहे. यामुळे परीक्षा संपल्यानंतर फिरण्यासाठी जाण्याचा प्लॅन करणार्यांना तिकिटे मिळवण्यासाठी कसरत करावी लागणार आहे.
कोल्हापुरातून उन्हाळी सुट्टीसाठी बाहेरगावी जाणार्यांची संख्या मोठी आहे. यापैकी अनेकजण रेल्वेला पसंती देतात. परिणामी कोल्हापुरातून सुटणार्या रेल्वेची मर्यादित संख्या आणि प्रवाशांची संख्या यामुळे बहुतांशी गाड्या तीव— पावसाचे दिवस वगळता बहुतांशी वर्षभर एक – दीड महिने अगोदरच फुल्ल होतात. यावर्षीही बहुतांशी गाड्यांचे मे अखेरपर्यंतचे रिझर्व्हेशन झाले आहे. काही गाड्यात काही वर्गाची कमी जास्त प्रमाणात तिकिटे उपलब्ध आहेत. मात्र, एकत्र जाणार्या प्रवाशांना याचा फार फायदा होणार नाही, असेच चित्र आहे. सध्या दहावी-बारावीच्या परीरक्षा सुरू आहेत. या परिक्षा संपल्यानंतर बुकिंगसाठी गर्दी वाढणार आहे. तत्पूर्वीच अनेक गाड्या फुल्ल झाल्या आहेत.
या गाड्या आहेत फुल्ल
कोल्हापूर-मुंबई महालक्ष्मी एक्स्प्रेस 20 मे
कोल्हापूर-धनबाद, दिशाभूमी एक्स्प्रेस : 15 जून
कोल्हापूर-अहमदाबाद एक्स्प्रेस : 25 मे
कोल्हापूर – दिल्ली सुपरफास्ट एक्स्प्रेस : 4 जून
कोल्हापूर-गोंदिया
महाराष्ट्र एक्स्प्रेस : 10 मे
कोल्हापूर-तिरुपती हरिप्रिया एक्स्प्रेस : 30 एप्रिल