Kolhapur Politics | महायुतीची उमेदवारी आपल्यालाच मिळणार : संजय मंडलिक

Kolhapur Politics | महायुतीची उमेदवारी आपल्यालाच मिळणार : संजय मंडलिक
Published on: 
Updated on: 

हमिदवाडा; पुढारी वृत्तसेवा : महायुतीची उमेदवारी आपल्यालाच मिळणार आहे व स्व. सदाशिवराव मंडलिक यांच्याकडून मिळालेल्या संघर्षाच्या वारशानुसार लोकसभा लढण्यासाठी मी सज्ज आहे, असे प्रतिपादन खासदार संजय मंडलिक यांनी केले. (Kolhapur Politics)

येथील साखर कारखाना कार्यस्थळावर लोकनेते सदाशिवराव मंडलिक यांच्या 9 व्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित अभिवादन मेळाव्यात अध्यक्ष स्थानावरून ते बोलत होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून माजी राज्यमंत्री आमदार राजेंद्र पाटील-यड्रावकर हे होते. यावेळी स्व. सदाशिवराव मंडलिक यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे पूजन मान्यवरांच्या हस्ते झाले. यावेळी आ. राजेंद्र पाटील म्हणाले, मंडलिक हे खर्‍याला खरे व खोट्याला खोटे म्हणणारे राजकारणातील आदर्श व्यक्तिमत्त्व होते व त्यांचाच वारसा खा. संजय मंडलिक नेटाने पुढे नेत आहेत. यावेळी कारखान्याचे उपाध्यक्ष शिवाजीराव इंगळे, यशोवर्धन मंडलिक, आर. डी. पाटील, मारुतराव काळुगडे उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

पुणे शहरातील सर्व अपडेट्स आता WhatsApp वर; आत्ताच जॉईन करा
logo
Pudhari News
pudhari.news