सतेज पाटील यांच्यात इतका बालिशपणा आला कोठून ? : मुश्रीफ | पुढारी

सतेज पाटील यांच्यात इतका बालिशपणा आला कोठून ? : मुश्रीफ

कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा : बिनविरोध निवडणुका वगैरे राजकारणात असे होत नाही. आ. सतेज पाटील यांच्यात इतका बालिशपणा कोठून आला कळत नाही. शाहू महाराज यांच्याविषयी मी आदराने बोललो. निवडणुकीत टीका टिपणी होत असते. त्या श्रद्धेला कुठे डाग लागू नये, अशी माझी भावना होती, असा टोला पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी पत्रकारांशी बोलताना लगावला.

कोल्हापूर लोकसभा निवडणुकीसाठी भाजपकडून समरजित घाटगे यांचे नाव पुढे आल्याच्या प्रश्नावर पालकमंत्री मुश्रीफ म्हणाले, कोण उमेदवार द्यावा, हा त्यांचा प्रश्न आहे. परंतु, सध्या तरी ही जागा शिवसेनेकडे आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्याबाबत निर्णय घेतील. सद्य:स्थितीत उमेदवार म्हणून खा. संजय मंडलिक यांचेच नाव आमच्यासमोर आहे; परंतु तिन्ही पक्ष जो उमेदवार देईल, त्याला निवडून आणू. लोकसभा निवडणुकीसाठी आठवड्यात कधीही आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे सर्वच पक्ष आपण केलेल्या विकासकामांचा प्रचार करण्यासाठी प्रयत्न करत असतात, असे सांगून पालकमंत्री मुश्रीफ म्हणाले, कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाबाबत तिन्ही पक्ष मिळून निर्णय घेतील.

Back to top button