कोल्हापूर : भुदरगडमध्ये ३५ गावांत अंगणवाडी मदतनीस भरती | पुढारी

कोल्हापूर : भुदरगडमध्ये ३५ गावांत अंगणवाडी मदतनीस भरती

रविराज वि. पाटील

गारगोटी : महाराष्ट्र शासन महिला व बालविकास विभाग यांच्या एकात्मिक बालविकास सेवा योजनेंतर्गत बालविकास प्रकल्प अधिकारी भुदरगड या प्रकल्पांतर्गत रिक्त असलेली अंगणवाडी मदतनीस यांची 35 गावांतील अंगणवाडीमध्ये भरती करण्यात येणार आहे. यासाठी तब्बल 180 अर्ज दाखल झाले आहेत. यासाठी महिला इच्छुकांमध्ये कागदपत्रांची जमवाजमव सुरू झाली आहे. गारगोटीतील एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प कार्यालयात झुंबड उडाली होती.

आप्पाचीवाडी, मोरस्करवाडी, पाळेवाडी, काळाम्मावाडी, मिणचे बुद्रुक पैकी धनगरवाडा, गिरगाव पैकी धनगरवाडा, सावतवाडी, गोतेवाडी, जकीनपेठ, भांडेबांबर, बेडीव पैकी धनगरवाडा, एरंडपे पैकी धनगरवाडा, माडेकरवाडी, पेठ शिवापूर, खेतवाडी, रावणवाडी, घावरेवाडी, फगरेवाडी, चोपडेवाडी, गडदुवाडी, खेतलवाडी, तळकरवाडी, मेघोली पैकी धनगरवाडा, आडे, झित्रेवाडी, मटकरवाडी, शिवाजीनगर, वाण्याचीवाडी, बांगडेवाडी, कोल्हेवाडी, कुडतरवाडी, मांगलेवाडी, सुतारवाडी, तिरवडे. अंगणवाडी मदतनीसांची शैक्षणिक अर्हता बारावी पास आहे. निकषानुसार भरती करण्यात येईल.

तालुक्यातील 35 गावातील अंगणवाडीमध्ये मदतनीस भरतीसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. शैक्षणिक अर्हता व शासनाच्या निकषानुसार भरती प्रक्रिया होईल.
– शीतल पाटील
(बालविकास प्रकल्प अधिकारी भुदरगड)

Back to top button