कोल्‍हापूर ; कूरजवळ खासगी ट्रॅव्हल्‍सच्या धडकेत गव्याचा मृत्‍यू

ट्रॅव्हल्‍सच्या धडकेत गव्याचा मृत्‍यू
ट्रॅव्हल्‍सच्या धडकेत गव्याचा मृत्‍यू

कोनवडे ; राम देसाई कूर ( ता.भुदरगड) येथे कालव्या शेजारी रस्त्यावर पहाटेच्यावेळी खासगी ट्रॅव्हलने धडक दिल्याने गव्याचा जागीच मृत्यू झाला. या अपघातात ट्रॅव्हल्सचेही नुकसान झाले आहे.

या विषयी घटनास्थळावरून मिळालेल्या अधिक माहिती अशी की, कोल्हापूर – गारगोटी राज्‍यमार्गावर कूर येथील कालव्या शेजारी रस्त्यावर पहाटे कोल्हापूर होऊन गारगोटीकडे खासगी ट्रॅव्हल्‍स बस निघाली होती. यावेळी बसने जोराची धडक दिल्याने गव्याचा जागीच मृत्यू झाला. या अपघातात ट्रॅव्हल्सचेही नुकसान झाले आहे. पहाटे शेताकडे जाणाऱ्या शेतकऱ्यांनी गवा रस्त्यातून मृत्युमुखी पडल्याचे पाहिल्याने तेथील शेतकऱ्यांनी वन विभागाशी संपर्क करून घटनेची माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच वन विभागाची टीम घटनास्थळी दाखल झाली.

यावेळी रेक्सू टिम गारगोटी यांचे सहकार्य लाभले. सदर घटनेचा पंचनामा पशुवैदयकिय अधिकारी श्रेणी १ चे डॉ . संजय दगडू, वनपाल कूर मारुती डवरी, वनरक्षक व्हि ए बोंडे, एस एस चौगले, वनसेवक बजरंग देसाई यांनी मृत्युमुखी गव्याचा पंचनामा केला.
सध्या जंगल परिसरात वनवा लावला जातो. त्यामुळे चाऱ्याच्या शोधात तसेच पाण्याच्या शोधात जंगली प्राणी शेत शिवारात गावाकडे वाटचाल करत असतात. त्यामुळे अशा प्रकारच्या घटना वन्य जिवांच्या बाबतीत घडत असतात. त्यामुळे वनविभागाने दक्ष राहुन जंगलात जाळ रेषा करणे महत्वाचे आहे.

हेही वाचा : 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news