कोल्हापूर : प्रत्येक जिल्ह्यात नेत्र, त्वचा स्वीकारणी केंद्र उभारणार : हसन मुश्रीफ | पुढारी

कोल्हापूर : प्रत्येक जिल्ह्यात नेत्र, त्वचा स्वीकारणी केंद्र उभारणार : हसन मुश्रीफ

अनिल देशमुख

कोल्हापूर : प्रत्येक जिल्ह्यात नेत्र आणि त्वचा स्वीकारणी केंद्र उभारले जाणार आहे. तसे आदेश राज्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी दिले आहेत.

सध्या ‘ब्रेनडेड’ व्यक्तीच्या अ वयव दान करण्याच्या प्रमाणात वाढ होत चालली आहे. भविष्यात ही मोठी उपलब्धता राहणार असल्याने राज्य सरकारकडूनही अवयवदानासाठी प्रसार आणि प्रचार केला जात आहे. त्यातून भविष्यात मोठ्या प्रमाणात नेत्र आणि त्वचा उपलब्ध होऊ शकते. त्याचा गरजू रुग्णांना मोठा फायदा होणार आहे. यामुळे प्रत्येक जिल्ह्यात नेत्र आणि त्वचा स्वीकारण्यासाठी केंद्रे उभारली जाणार आहेत.

भाजून जखमी झालेल्या रुग्णांना लाभ

विविध कारणांनी भाजलेल्या रुग्णांना त्वचा स्वीकारणी केंद्रांचा मोठा लाभ होणार आहे. अशा रुग्णांसाठी जिवंत त्वचा (ब्रेनडेड झालेल्या; पण शरीर जिवंत असलेल्या व्यक्तीकडून) उपलब्ध झाली, तर संबंधित रुग्णाला ती चांगल्या पद्धतीने लावता येते. संबंधित रुग्णाच्या त्वचेशी ती सहजपणे जुळून जाते. यामुळे भाजलेल्या जागी त्याचे प्रत्यारोपण झाल्यानंतर जखमांचे व्रण राहण्याची शक्यता खूप कमी होते.

Back to top button