निम्म्या कोल्हापूरचा पाणीपुरवठा सोमवारी बंद | पुढारी

निम्म्या कोल्हापूरचा पाणीपुरवठा सोमवारी बंद

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : शहरातील पुईखडी येथील 110 केव्ही सबस्टेशन दुरुस्तीसाठी महावितरणकडून विद्युत पुरवठा खंडित करण्यात येणार आहे. त्यामुळे पुईखडीचा पाणीपुरवठा सोमवारी (दि. 26) बंद ठेवण्यात येणार आहे. परिणामी, पुईखडीवर अवलंबून असलेल्या शहरातील भागाचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. तसेच मंगळवारी (दि. 27) अपुरा व कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे.

शहरातील ए व बी वॉर्ड अंतर्गत पाण्याचा खजिना, मंगळवार पेठ, शिवाजी पेठ, मंगेशकरनगर, मिरजकर तिकटी, भारत डेअरी परिसर, संभाजीनगर, मंडलिक वसाहत, तिकोणे गॅरेज, कीर्ती हौसिंग सोसायटी परिसर, कोळेकर तिकटी, पोतनीस बोळ, शाहू बँक परिसर, कोष्टी गल्ली, प्रॅक्टिस क्लब, वारे वसाहत, साळोखेनगर, बापूरामनगर, महाराष्ट्रनगर, सुर्वेनगर, प्रथमेशनगर, शिवगंगा कॉलनी, प्राध्यापक कॉलनी,
वाल्मिकी आंबेडकरनगर, राधे कॉलनी, शांती उद्यान, इंगळे मळा, आई कॉलनी, कात्यायनी कॉम्प्लेक्स परिसर, जरगनगर, गंजीमाळ, रामानंदनगर, नाळे कॉलनी, विजयनगर, जुनी मोरे कॉलनी, नवी मोरे कॉलनी, वर्षानगर, भारतनगर, सुभाषनगर पंपिंगवरील ग्रामीण भाग, पाचगाव, आर. के. नगर, पुईखडी, जिवबा नाना पार्क, विशालनगर, आयसोलेशन, वाय. पी. पोवार नगर, वर्षा विश्वास परिसर, शिवस्वरूप कॉलनी, पोस्टल कॉलनी, आर. के. नगर, जरगनगर आदी भागातील नागरिकांना दैनंदिन पाणी पुरवठा होऊ शकणार नाही. या भागातील नागरिकांनी उपलब्ध पाणी काटकसरीने वापरून सहकार्य करावे, असे आवाहन महापालिकेने पत्रकाद्वारे केले आहे.

Back to top button