शेणगाव (ता. भुदरगड) येथे सुशीला कुंभार यांच्या घराला शॉर्टसर्कीटने लागलेल्या आगीमुळे लाखांचे नुकसान झाले.
शेणगाव (ता. भुदरगड) येथे सुशीला कुंभार यांच्या घराला शॉर्टसर्कीटने लागलेल्या आगीमुळे लाखांचे नुकसान झाले.

भुदरगड : शेणगाव येथे शॉर्टसर्किटने घराला आग, प्रापंचिक साहित्याचे नुकसान

Published on

मिणचे खुर्द – पुढारी वृत्तसेवा – शेणगाव (ता. भुदरगड) येथे मध्यरात्रीच्या सुमारास सुशिला कृष्णा कुंभार यांच्या घराला शॉर्टसर्किटने आग लागून घरासह प्रापंचिक साहित्याचे मोठे नुकसान झाले आहे. कुंभार यांचे या आगीत लाखाचे नुकसान झाले.

संबंधित बातम्या –

शेणगाव येथे कुंभार गल्लीत सुशिला कृष्णा कुंभार राहतात. मुलगा बाहेरगावी असल्याने त्या एकट्या होत्या. जेवण आटोपून त्या नेहमीप्रमाणे संध्याकाळी आठच्या सुमारास शेजारील भावजय यांचे घरी झोपण्यासाठी गेल्या. आज पहाटे तीनच्या सुमारास शॉर्ट सर्किटमुळं घरातील कपड्याला आग लागली. बघता बघता आग सर्वत्र पसरली. आगीमुळे घरातून आगीच्या ज्वाला बाहेर आल्या. लाकडी साहित्य असल्यामुळे आग वाढत गेली. घराचे पत्रे गरम झाल्यावर पत्र्याचा आवाज जोरात येवू लागला. या आवाजाने शेजारी राहत असलेले योगेश कोळी यांनी बाहेर येऊन बघितलं तर घराला आग लागली होती.

गल्लीतील सर्वांना जोरात आवाज देत शेजाऱ्यांना उठवले. अग्निशामक दलाला पाचारण केले. गल्लीतील नागरिकांच्या मदतीने आणि ग्रामपंचायत कर्मचारी संतोष कुंभार यांनी घराच्या नळाला पाणी सोडून मदत केली. त्यामुळे घराची आग आटोक्यात आणण्यात ग्रामस्थांना यश आले. सदर घटनेमध्ये कोणतीही जीवीत हानी झाली नाही. या घटनेमुळे सुशीला कुंभार यांच्या घरातील प्रापंचीक साहित्य, आणि घराचे‌ मोठे नुकसान झाले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news