कुरुंदवाड-नांदणी खून : दोन संशयित ताब्यात; एक फरार

कुरुंदवाड-नांदणी खून : दोन संशयित ताब्यात; एक फरार

कुरुंदवाड : पुढारी वृत्तसेवा – सांगली येथील संतोष कदम हत्या प्रकरणातील सांगली जिल्हा तालुका मिरज समडोळी येथील वीट भट्टीवर काम करणाऱ्या दोन संशयितांना मध्यरात्री कुरुंदवाड पोलिसांनी ताब्यात घेतले. तर एक जण फरार आहे. नोकरी लावतो असे सांगून दोघांकडून लाखो रुपये संतोषने घेतल्याचे समजते. यातूनच त्याची हत्या झाली असावी असा पोलिसांचा अंदाज आहे.

संबंधित बातम्या –

दरम्यान पोलीस उपअधीक्षक समीरसिंह साळवे, सपोनी रविराज फडणीस यांनी २४ तासातच या दोन संशयितांना ताब्यात घेतले आहे.

सांगली येथील बेपत्ता माहिती अधिकार कार्यकर्ता संतोष विष्णु कदम (वय ३६, रा. गावभाग सांगली) याचा धारदार चाकूने वार करुन खून झाल्याची खळबळजनक घटना गुरुवारी सकाळी उघडकीस आली. कदम याचा रक्तबंबाळ अवस्थेतील मृतदेह मारुती स्वीफ्ट या चारचाकी वाहनात आढळून आला. खून करुन हल्लेखोर वाहन रस्त्यावर सोडून पसार झाले. दरम्यान, सांगली महापालिकेवर गुरुवारी गाढव मोर्चा काढण्यासाठी सांगली शहर पोलीस स्टेशनला संतोष कदम आणि निवेदन देण्यासाठी गेला असता त्यावेळी त्याला आलास ता. शिरोळ येथील माती औटीवरून फोन आला होता.

कुरुंदवाड पोलिसांनी त्या माती औटीवरील जेसीबी चालकाला ताब्यात घेऊन कसून चौकशी केली. समडोळी येथील वीट भट्टीवर काम करणाऱ्या दोन कामगारांना ताब्यात घेतले. तर एकजण फरार आहे. पोलिसांनी तपास यंत्रणा गतिमान केली असून त्याच्या शोधासाठी पथके रवाना केली आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news