कोल्हापूर: हजगोळी येथील शेतकऱ्याचा ट्रॅक्टरखाली सापडून मृत्यू | पुढारी

कोल्हापूर: हजगोळी येथील शेतकऱ्याचा ट्रॅक्टरखाली सापडून मृत्यू

चंदगड: पुढारी वृत्तसेवा : हजगोळी (ता. चंदगड) येथील नारायण पांडुरंग कणगुटकर (वय ५१) हा शेतकरी ट्रॅक्टर खाली सापडून जखमी झाला होता. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र, सोमवारी (दि. ५) उपचारादरम्यान त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.

याबाबत अधिक माहिती अशी की, नारायण हे आपल्या कलिवडे येथील जावयाच्या शेतात नांगरटीसाठी ट्रॅक्टर घेऊन जात असताना वाटेत एका वळणावरील खड्ड्यात ट्रॅक्टर पलटी झाला. यामध्ये ते गंभीर जखमी झाले होते.

त्यांना तत्काळ बेळगावच्या केएलई रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. गेले चार दिवस त्यांच्यावर उपचार सुरू होते. दरम्यान, सोमवारी सकाळी अकरा वाजता उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, जावई असा परिवार आहे.

हेही वाचा 

Back to top button