कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : पिसाळलेल्या कुत्र्याने शहरातील भाऊसिंगजी रोड, सीपीआरसह दसरा चौक व टाकाळा परिसरात शनिवारी दिवसभर दहशत माजविली. या कुत्र्याने कॉलेज युवतीसह 20 जणांना चावा घेतला असून जखमीवर शासकीय रुग्णालयात उपचार करण्यात आले.
टाकाळा चौकात पिसाळलेल्या कुत्र्याने प्रीतम कृष्णात पाटील (वय 35, रा. करंजफेण, ता. शाहूवाडी) यांच्या पायाला चावा घेऊन जखमी केले. त्यानंतर महापालिका, भाऊसिंगजी रोड, सीपीआर व दसरा चौकात याच कुत्र्याने आणखी अनेकांचा चावा घेतला.
यात सेट्रिंग कामगार भैरव आनंदा वरंबळे (वय 57, रा. वरणगे पाडळी, ता. करवीर), अरुण आंग्रे (शाहूपुरी), समीर पखाली (34, सुभाषनगर), अमेय भोसले (28, अंकलखोप, ता. पलूस), मधुकर ज्ञानदेव फाळके (74, मंगळवार पेठ), चंद्रकांत कुलकर्णी (48), बाबासाहेब महादेव सौदलगे (70, शनिवार पेठ), अमर मारुती पोवार (41, प्रयाग चिखली, ता. करवीर), सृष्टी सुनील शिंदे (21, नागाळा पार्क), संतोष भारत रामडू (31, एस.एस.सी बोर्ड), गोविंदा हारू सोरटे (72, शनिवार पेठ), पंकज दिलीप वाकेकर (31, पुणे) यांच्यासह एकूण 20 जणांचा समावेश आहे.
विक्रमनगर, टेंबलाईवाडी, टाकाळा, हॉकी स्टेडियम, संंभाजीनगर, रामानंदनगर पूल, जरगनगर, पाचगाव, मोरेवाडी, कंदलगाव, गिरगावसह गांधीनगर परिसरातही मोकाट कुत्र्यांची दहशत वाढल्याने नागरिकांत भीतीचे वातावरण आहे.