रंकाळा संवर्धन निधी इतरत्र वापरू नका : राजेश क्षीरसागर | पुढारी

रंकाळा संवर्धन निधी इतरत्र वापरू नका : राजेश क्षीरसागर

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : ऐतिहासिक रंकाळा तलावाच्या संवर्धनासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोट्यवधी रुपयांचा निधी दिला आहे. हा निधी रंकाळा संवर्धनाच्या कामाव्यतिरिक्त इतरत्र खर्च कर नका, अशा सूचना राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी मनपा अधिकार्‍यांना दिल्या. क्षीरसागर यांनी प्रशासक के. मंजुलक्ष्मी यांच्यासह अधिकार्‍यांसोबत रंकाळ्याभोवती मॉर्निंग वॉक केले.

दिवस-रात्र गस्ती पथकाची नियुक्ती करून अवैध प्रकारांवर आळा घाला, रंकाळा बोटिंग परिसराची स्वच्छता करावी, ओपन जिम, लहान मुलांची खेळणी दुरुस्त करावीत, उद्यानात 100 बेंच बसविण्यात यावेत, वॉकिंग ट्रॅक, पदपथावरील निखळलेले पेव्हिंग ब्लॉक बसवावेत, अशा मागण्या यावेळी नागरिकांतून करण्यात आल्या.

रंकाळा शाहू स्मृती उद्यानात राजर्षी शाहूंचा भव्य पुतळा

राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचा भव्य पुतळा स्मृती उद्यानात उभारण्याच्या द़ृष्टीने मनपा प्रशासनाने आराखडा तयार करावा, अशा सूचनाही क्षीरसागर यांनी दिल्या.

यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख सुजित चव्हाण, अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ, शहर अभियंता हर्षजित घाटगे, उपशहर अभियंता नारायण भोसले, पुरातत्त्व समितीच्या श्रीमती निंबाळकर, उद्यान अधिकारी समीर व्याघ—ाम्बरे, जुना राजवाडा पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक पाटोळे आदी अधिकारी, शिवाजी जाधव, शहरप्रमुख रणजित जाधव उपस्थित होते.

Back to top button