गायक सोनू निगम यांच्या वडिलांचे चोरलेले 72 लाख कोल्हापुरातून हस्तगत

गायक सोनू निगम यांच्या वडिलांचे चोरलेले 72 लाख कोल्हापुरातून हस्तगत
Published on
Updated on

कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा :  गायक सोनू निगम यांचे वडील अगमकुमार यांच्या ओशिवरा येथील बंगल्यातून 72 लाखांची चोरी करणारा संशयित तरुण कोल्हापूर येथे वास्तव्यास असल्याचे निष्पन्न झाले आहे. रमजान मुजावर ऊर्फ रेहान (वय 32) असे त्याचे नाव असल्याचे समजते. संशयिताच्या येथील घरावर छापा टाकून ओशिवरा पोलिसांनी रोकड हस्तगत केल्याची चर्चा आहे. मात्र, या वृत्तास अधिकृत दुजोरा मिळत नाही. स्थानिक पोलिस यंत्रणाही अनभिज्ञ आहे.

गायक सोनू निगम यांच्या वडिलांच्या घरातून 72 लाखांच्या रकमेची नुकतीच चोरी झाली आहे. सोनूची बहीण निकिता यांनी याप्रकरणी ओशिवरा पोलिस ठाण्यात अनोळखी व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

सीसीटीव्ही फुटेजद्वारे नाव निष्पन्न

सीसीटीव्ही फुटेजद्वारे शोध घेतला असता, अगमकुमार यांच्याकडे चालक म्हणून कामाला असलेल्या रमजान मुजावर ऊर्फ रेहान याचे नाव निष्पन्न झाले आहे. ओशिवरा पोलिसांनी गुरुवारी रात्री त्यास मुंबईतून ताब्यात घेण्यात आले. पोलिसांनी त्याच्यावर प्रश्नांचा भडीमार केला.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news