ओळख वारसास्थळांची... | पुढारी

ओळख वारसास्थळांची...

इसवी सन 1945-46 च्या दरम्यान कोल्हापुरातील प्राचीन ब—ह्मपुरी टेकडीवरील उत्खननात सापडलेल्या वस्तूंचे जतन कोठे करायचे, या प्रश्नातून संग्रहालयाची संकल्पना पुढे आली. यातून 30 जानेवारी 1946 रोजी कोल्हापूर वस्तुसंग्रहालयाची स्थापना झाली. 1949 मध्ये टाऊन हॉल उद्यानातील कोल्हापूर नगर मंदिरात वस्तुसंग्रहालय सुरू झाले.

कोल्हापूर नगर मंदिर (टाऊन हॉल) ही वास्तू इसवी सन 1872 ते 76 या कालावधीत रॉयल इंजिनिअर सी मॉट यांच्या देखरेखीखाली गॉथिक वास्तुशास्त्रानुसार बांधण्यात आली. संग्रहालयात इ.स. 200 ते इ.स. पूर्व 200 या कालावधीतील समुद्र देवता, रोमन पदक, प्राचीन काळी कोल्हापूरचा जगभराशी असणार्‍या व्यापारी संबंधांची माहिती देणारा नकाशा (समुद्र मार्ग), प्राचीन हिंदू-जैन धर्मातील देवतांच्या मूर्ती, विविध कालावधीतील शस्त्रास्त्रे, शिल्पाकृती आदी ऐतिहासिकद़ृष्ट्या महत्त्वाच्या अनेक वस्तूंचा समावेश आहे. कोल्हापूरच्या सुमारे दोन हजार वर्षांच्या इतिहासाचा ठेवा या संग्रहालयात एकवटला आहे.

पाहा व्हिडिओ : टाऊन हॉल : कोल्हापुरचं जगप्रसिद्ध वास्तूवैभव

 

 

Back to top button