म्हाकवे इंग्लिश स्कूल म्हाकवे विज्ञान प्रदर्शनात जिल्ह्यात प्रथम | पुढारी

म्हाकवे इंग्लिश स्कूल म्हाकवे विज्ञान प्रदर्शनात जिल्ह्यात प्रथम

म्हाकवे, पुढारी वृतसेवा : कुंभोज (ता. हातकणंगले) येथे झालेल्या ५१ व्या कोल्हापूर जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनामध्ये म्हाकवे इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेज म्हाकवे (ता . कागल) या प्रशालेची स्नेहल संजय हावलदार हिच्या उपकरणाचा उच्च माध्यमिक ( ९ वी ते १२ वी ) गटामध्ये प्रथम क्रमांक आला. शाळेच्या उपकरणाची राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनासाठी निवड झाली आहे. सलग दुसऱ्या वर्षी या शाळेची राज्य स्तरावर विज्ञान प्रदर्शनासाठी निवड झाली आहे. स्नेहलला वाय. ए. पाटील, पी. बी. भारमल यांचे मार्गदर्शन लाभले.

यावेळी यशस्वी विद्यार्थ्यांना पुणे विभागाचे शिक्षक आमदार श्री जयंत आसगावकर व कोल्हापूर जिल्ह्याचे माध्यमिक शिक्षणाधिकारी डॉ श्री एकनाथ आंबोकर यांच्या हस्ते बक्षीस देऊन सन्मानित करण्यात आले.

Back to top button