कोल्‍हापूर : शिरोळमधील शेडशाळ येथे एसटी बसला अपघात; १७ प्रवासी जखमी | पुढारी

कोल्‍हापूर : शिरोळमधील शेडशाळ येथे एसटी बसला अपघात; १७ प्रवासी जखमी

कवठेगुलंद ; पुढारी वृत्तसेवा शिरोळ तालुक्यातील शेडशाळ माळभाग येथे एसटी बसच्या स्टेरिंगमध्ये बिघाड झाल्‍याने अपघात झाला. यामध्ये बसमधील ४७ प्रवासी बसमध्येच अडकून पडले. या अपघातात १६ ते १७ प्रवासी जखमी झाले आहेत. दरम्यान जखमींमध्ये विद्यार्थ्यांचा सहभाग असल्याची माहिती समोर आली आहे.

कुरुंदवाड आगाराहून सदरची एसटी बस गणेशवाडीला जात होती. अचानक समोरून येणाऱ्या वाहनाला रस्ता देताना स्टेरिंग मध्ये बिघाड झाल्‍याने चालकाचा बसवरील ताबा सुटला व बस थेट लगत असलेल्या चरीमध्ये गेली. बसमध्ये सुमारे ४७ प्रवासी अडकले व अनेक प्रवासी तसेच विद्यार्थी जखमी झाल्याने परिसरातील ग्रामस्थांनी प्रसंगावधान राखून तातडीने सर्वांना बसमधून बाहेर काढून पुढील उपचारासाठी रुग्णालयात पाठवले.

दरम्यान सदरची घटना समजताच कुरुंदवाड आगार विभागाचे अधिकारी तसेच कुरुंदवाड पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल झाले असून, याबाबत माहिती घेण्याचे काम सुरू आहे.

हेही वाचा : 

Back to top button