विरोधकांचे डिपॉझिट जप्त होणार : मंत्री पाटील | पुढारी

विरोधकांचे डिपॉझिट जप्त होणार : मंत्री पाटील

चंदगड : पुढारी वृत्तसेवा

जिल्ह्याचे शेवटचे टोक असणार्‍या चंदगड तालुक्याकडे कुणाचेच लक्ष नव्हते. मात्र, महाविकास आघाडी सरकाने कोट्यवधींचा निधी मंजूर केला आहे. विरोधकांचे काम फक्त विरोध करण्यात गेले. त्यामुळेच विरोधकांचे डिपॉझिट जप्त होईल. वजय आपलाच होणार ही काळ्या दगडावरची रेघ असल्याचा दावा महाविकास आघाडीचे उमेदवार पालकमंत्री सतेज पाटील यांनी केले.

चंदगड येथे आयोजित प्रचार दौर्‍याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी चंदगड तालुक्यातून 95 टक्के मतदान ना. पाटील यांना देण्याची ग्वाही आ. राजेश पाटील यांनी दिली. यावेळी एकूण 25 मतदारांपैकी चंदगडच्या नगराध्यक्ष प्राची काणेकर, उपनगराध्यक्ष फिरोज मुल्ला यांच्यासह 14 नगरसेवक, 3 जि. प. सदस्य, पं. स. सभापती अनंत कांबळे असे 18 मतदार उपस्थित होते.

यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख विजय देवणे, गोपाळराव पाटील, संग्रामसिंह नलवडे, संग्रामसिंह कुपेकर, गोपाळराव पाटील, अंजना रेडेकर, विलास पाटील उपस्थित होते.

काँग्रेस सदस्य अनुपस्थित…

नरसिंगराव पाटील व भरमूअण्णा पाटील यांची जि.प.मध्ये युती होती. त्यावेळी अरुण सुतार व सचिन बल्लाळ हे काँग्रेसच्या तिकिटावर निवडून आले आहेत. मात्र, अलीकडे भरमूअण्णांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने बल्लाळ अनुपस्थित राहिले असावेत. हा धागा पकडून मंत्री सतेज पाटील यांनी बल्लाळ यांना कडक शब्दांत स्वगृही येण्याचे आवाहन केले.

मंत्री मुश्रीफ, पाटील यांचा मतदारांशी संवाद

गडहिंग्लज : शुक्रवारी मंत्री हसन मुश्रीफ यांच्या उपस्थितीत पालकमंत्री सतेज पाटील यांनी गडहिंग्लजमधील महाविकास आघाडीच्या मतदारांची भेट घेऊन संवाद साधला. गडहिंग्लज नगरपालिकेत महाविकास आघाडीचे राष्ट्रवादीचे सहा, शिवसेनेचा एक नगरसेवक असे सातचे संख्याबळ आहे. तर जि. प. सदस्य सतीश पाटील यांच्या रूपाने एक मतदार आहे. या सर्वांची भेट घेऊन दोन्ही मंत्र्यांनी संवाद साधला.

ना. पाटील दुसर्‍यांदा अ‍ॅड. शिंदेंच्या भेटीला

गडहिंग्लज : मंत्री सतेज पाटील यांनी शुक्रवारी जनता दलाचे नेते अ‍ॅड. श्रीपतराव शिंदे यांची दुसर्‍यांदा भेट घेतली. चार दिवसांपूर्वी ना. पाटील यांनी अ‍ॅड. शिंदे यांच्यासह जनता दलाच्या सर्व नगरसेवकांची भेट घेऊन आपल्याला साथ देण्याचे आवाहन केले होते. अ‍ॅड. शिंदे यांनीही यावेळी सकारात्मकता दाखविल्याचे समजते. यावेळी आ. राजेश पाटील, संग्रामसिंह नलवडे आदी उपस्थित होते.

मंत्री पाटील यांची आजर्‍यातील नगरसेवकांची भेट

आजरा : मंत्री सतेज पाटील यांनी शुक्रवारी आजर्‍यात ताराराणी आघाडीच्या नगरसेवकांशी बंद खोलीत चर्चा केली. यावेळी आघाडीप्रमुख अशोक चराटी, नगराध्यक्षा ज्योत्स्ना चराटी उपस्थित होते. या बैठकीनंतर पाटील यांनी सूतगिरणी नजीकच्या हॉटेलवर महाविकास आघाडीच्या नगरसेवकांची भेट घेतली. यावेळी जि. प. उपाध्यक्ष जयवंतराव शिंपी, नगरसेवक अभिषेक शिंपी, किरण कांबळे उपस्थित होते.

पाहा व्हिडिओ : मिलिंद तेलतुंबडे नक्षलवादी कसा बनला

Back to top button