‘पुढारी’ शॉपिंग-फूड फेस्टिव्हलच्या स्टॉल बुकिंगला उदंड प्रतिसाद | पुढारी

‘पुढारी’ शॉपिंग-फूड फेस्टिव्हलच्या स्टॉल बुकिंगला उदंड प्रतिसाद

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : लज्जतदार, चमचमीत शाकाहारी आणि मांसाहारी पदार्थांचा आस्वाद घेत मनसोक्त शॉपिंगची संधी उपलब्ध करून देणारा ‘पुढारी’ कस्तुरी क्लब आयोजित शॉपिंग अँड फूड फेस्टिव्हल दरवर्षीप्रमाणे कोल्हापुरात 22 ते 26 डिसेंबर दरम्यान होणार आहे. या फेस्टिव्हलमधील स्टॉल्स बुकिंगला उदंड प्रतिसाद मिळाला आहे.

चारचाकी, इलेक्ट्रॉनिक्स, गारमेंट, होम डेकोर, आयुर्वेदिक प्रॉडक्ट यांच्याबरोबर शाकाहारी आणि मांसाहारी नानाविध पदार्थ फेस्टिव्हलच्या एकाच छताखाली उपलब्ध होणार आहेत. या प्रदर्शनासाठी रॉनिक स्मार्ट वॉटर हिटर आणि सोसायटी टी हे सहप्रायोजक तसेच आईस्क्रिम पार्टनर म्हणून क्रेझी आईस्क्रिम हे लाभले आहेत.

गृहोपयोगी वस्तूंसाठी भव्य मंडप

संबंधित बातम्या

यामध्ये चारचाकीपासून ते फर्निचरपर्यंत, किचन ट्रॉली, सौंदर्य प्रसाधने, इलेक्ट्रॉनिक वस्तू, कपडे, चटण्या, लोणचे, मसाल्याचे पदार्थ, प्लास्टिकच्या विविध वस्तू, बँ्रडेड शूज, ज्वेलरी असे अनेक स्टॉल प्रदर्शनामध्ये उपलब्ध असतील.

खरेदी आणि खाद्यप्रेमींसाठी हे फेस्टिव्हल पर्वणी ठरणार असून, या फेस्टिव्हलअंतर्गत व्यावसायिक व खाद्यपदार्थांचे मिळून 130 हून अधिक स्टॉल असणार आहेत. आयर्विन ख्रिश्चन हायस्कूल मैदान, गवत मंडई, शाहूपुरी येथे 22 ते 26 डिसेंबरदरम्यान सकाळी 10.30 ते रात्री 9 पर्यंत हा फेस्टिव्हल होणार आहे. फेस्टिव्हलमध्ये खरेदीसोबत चमचमीत पदार्थांवर ताव मारण्याची संधी खवय्यांना मिळणार आहे, तसेच लहान मुलांना अम्युझमेंट पार्कची धम्माल अनुभवता येणार आहे.
खवय्यांसाठी

व्हेज-नॉन व्हेजची पर्वणी

पाच दिवस चालणार्‍या या शॉपिंग आणि खाद्य महोत्सवामध्ये नॉनव्हेज खवय्यांसाठी तांबडा – पांढरा रस्सा, वडा कोंबडा, तंदूर-कबाब, चिकन 65, खिमा पराठा, फिशचे नावीन्यपूर्ण प्रकार, सोलापुरी मटण-चिकन थाळी तसेच शाकाहारी खवय्यांसाठी थालीपीठ, इडली – उडीद वडा, चौपाटी पदार्थ, साऊथ इंडियन, पिझ्झा सँडविचसारखे फास्ट फूड, स्प्रिंग पोटॅटो अशा पदार्थांची रेलचेल आहे. प्रदर्शनामध्ये नॉनव्हेज पदार्थांचा स्टॉल लावू इच्छिणार्‍या उद्योजकांनी 8329572628 या क्रमांकावर संपर्क साधावा.

ऑटोमोबाईलसाठी स्वतंत्र दालन

ऑटोमोबाईलच्या स्वतंत्र दालनाची व्यवस्था असून, गृहोपयोगी वस्तू आणि खाद्यपदार्थांसाठीसुद्धा वेगळे विभाग करण्यात आले आहेत. या प्रदर्शनासंबंधी अधिक माहिती साठी 9834433274 या मोबाईल क्रमांकांवर संपर्क साधावा.

फेस्टिव्हलची तयारी अंतिम टप्प्यात

खरेदीची आणि खवय्येगिरीची पर्वणी असलेल्या ‘पुढारी’ शॉपिंग फेस्टिव्हलला दोनच दिवस बाकी असून, आयर्विन ख्रिश्चन हायस्कूलच्या मैदानावर त्यासाठी जोरदार तयारी सुरू आहे. स्टॉलसाठी तसेच खरेदी दालनासाठी भव्य स्ट्रक्चर उभारण्यास सुरुवात झाली आहे. पुढच्या दोन दिवसांत स्टॉलधारकांना स्टॉल्सचे वितरण होणार असून शुक्रवार, दि. 22 रोजी फेस्टिव्हलचे उद्घाटन होणार असून, तत्पूर्वी सर्व तयारी पूर्ण करण्यात येणार आहे.

महिला उद्योजकांना व्यवसायासाठी खास संधी

महिला उद्योजकांच्या व्यवसायाला वृद्धिंगत करण्यासाठी कस्तुरी क्लबच्या सदस्यांना तसेच बचत गटाच्या महिलांसाठी या प्रदर्शनामध्ये त्यांची उत्पादने आणि माहिती हजारो ग्राहकांपर्यंत पोहोचवण्याची संधी यावर्षी उपलब्ध करून देण्यात आली आहे. या विभागात भाग घेऊ इच्छिणार्‍या महिलांनी बुकिंग करिता 8805007724 या क्रमांकावर संपर्क साधावा.

मनोरंजनात्मक कार्यक्रमांची मेजवानी

अजिबात तोल न जाता उंच काठीवर चालणारा स्टिक मॅन, एकाच वेळी हवेत अनेक वस्तू खेळवत राहणारा जगलर तसेच सर्वांना हसविणारा रंगीबेरंगी जोकर हा अबालवृद्धांचा कुतूहलाचा विषय असणार आहे. प्रदर्शनाच्या प्रमुख द्वारास आकर्षक रोषणाई करण्यात येणार आहे. दररोज सायंकाळी पाचही दिवस कराओके, लाईव्ह ऑर्केस्ट्रा गाण्यांच्या तसेच डीजे नाईट अशा अनेकविध कार्यक्रमांचेसुद्धा आयोजन करण्यात आले आहे. प्रदर्शनामध्ये 360 अंशांमध्ये फिरणार्‍या सेल्फी पॉईंटमधून स्वतःचा 360 अंशांचा व्हिडीओ सेल्फी घेण्याची संधीसुद्धा अतिशय कमी शुल्कामध्ये उपलब्ध करून देण्यात आली आहे.

Back to top button