दिलबहार-जुना बुधवार बरोबरी

दिलबहार-जुना बुधवार बरोबरी
Published on
Updated on

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : दिलबहार तालीम मंडळ विरुद्ध संयुक्त जुना बुधवार पेठ यांच्यातील सामना अटीतटीचा झाला. संपूर्ण वेळ दोन्ही संघांकडून एकाही गोलची नोंद न झाल्याने सामना गोलशून्य सामना तुल्यबळ ठरला. दोन्ही संघांना प्रत्येकी एक गुण देण्यात आला. तत्पूर्वीच्या सामन्यात बीजीएम स्पोर्टस्ने सोल्जर्स ग्रुपचा टायब्रेकरवर 5-4 असा असा पराभव करून आघाडी मिळविली.

कोल्हापूर स्पोर्टस् असोसिएशन आयोजित केएसए शाहू छत्रपती फुटबॉल लीग स्पर्धा छत्रपती शाहू स्टेडियमवर सुरू आहे. दिलबहार तालीम विरुद्ध संंयुक्त जुना बुधवार यांच्यातील सामना सुरुवातीपासूनच वेगवान झाला. शॉर्टपासिंगसह जोरदार चढाया करत दोन्ही संघांकडून आघाडीसाठी प्रयत्न सुरू होते. दोन्ही संघांचा बचावही तितकाच मजबूत होता. बचावफळीसह दोन्ही संघातील गोलरक्षक शुभम घराळे व संदीप सिंग यांनी उत्कृष्ट गोलरक्षण केले. दिलबहारकडून पवन माळी, स्वयम साळोखे, जावेद जमादार, रोहन दाभोळकर, सतेज साळोखे, विष्णूत विटील यांनी तर संयुक्त जुना बुधवारकडून रविराज भोसले, प्रकाश संकपाळ, सोनम शेरपा, सचिन गायकवाड, सचिन मोरे यांनी उत्कृष्ट खेळ केले. जुना बुधवारच्या सोनम शेरपा यांचे दोन फटके गोलपोस्टला लागून गेले. तर दिलबहारचा विष्णूत विटील याचा फटकाही गोलपोस्टला लागून गेला. यामुळे दोन्ही संघांकडून एकही गोल न झाल्याने सामना गोलशून्य बरोबरीत झाला.

बीजीएम-सोल्जर्स निकाल टायब्रेकरवर

दुपारच्या सामन्यात बीजीएम-सोल्जर्स पूर्णवेळेत 1-1 बरोबरी झाली. सोल्जर्स ग्रुपच्या देवराज जाधव याने 34 व्या मिनिटाला केलेल्या गोलची परतफेड बीजीएमच्या राहुल माझी याने 39 व्या मिनिटाला केली. यामुळे मध्यंतरापर्यंत सामना 1-1 असा बरोबरीत होता. उत्तरार्धातही दोन्ही संघांकडून गोल न झाल्याने सामना 1-1 असा बरोबरीत झाला. यामुळे नव्या नियमानुसार सीनियर गटातील सामन्यांचा निकाल टायब्रेकरवर लावण्यात आला. यात बीजीएमकडून वैभव राऊत, महेश पाटील, अभिराज काटकर, सुभो अधिकारी, राहुल माझी यांनी गोल केले तर सोल्जर्स ग्रुपच्या हरिष पाटील, देवराज जाधव, ओमकार चौगुले, रोमारिओ यांना गोलची परतफेड करता आली. मात्र रमाकांत लोखंडे याचा फटका अपयशी ठरला. यामुळे सामना बीजीएमने 5-4 असा जिंकला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news