Subhash Chaugule : कोल्हापूर शिक्षण मंडळाच्या विभागीय सचिवपदी सुभाष चौगुले | पुढारी

Subhash Chaugule : कोल्हापूर शिक्षण मंडळाच्या विभागीय सचिवपदी सुभाष चौगुले

मुदाळतिट्टा, पुढारी वृत्तसेवा : कोल्हापूर माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या विभागीय सचिव पदी सुभाष चौगुले यांची नियुक्ती झाली आहे. सोमवारी (दि.१८) ते पदभार स्वीकारणार आहेत. Subhash Chaugule

सुभाष चौगुले हे कोल्हापूर जिल्ह्यातील मळगे खुर्द चे असून त्यांचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषदेच्या मळगे खुर्द येथील प्राथमिक शाळेत झाले. माध्यमिक शिक्षण मळगे विद्यालय मळगे बु. येथे झाले. देवचंद कॉलेज अर्जुननगर येथे बीएससी पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. शिवाजी विद्यापीठ येथे एमएससी व आदर्श कॉलेज ऑफ एज्युकेशन पुणे येथून त्यांनी बीएडचे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठातून एमएड पदवी घेतली. Subhash Chaugule

सन २०१३ मध्ये एम पी एस सी मार्फत शिक्षणाधिकारी म्हणून त्यांची निवड झाली. तत्पूर्वी मेन राजाराम, ज्युनियर कॉलेज कोल्हापूर येथे १४ वर्षे प्राध्यापक म्हणून त्यांनी नोकरी केली. जिल्हा परिषद सिंधुदुर्गचे शिक्षणाधिकारी (निरंतर) म्हणून दोन वर्षे व कोल्हापूरचे शिक्षणाधिकारी म्हणून ३ वर्षे काम पाहिले.२०१८ मे पासून कोल्हापूर शिक्षण उपसंचालक कार्यालयात सहाय्यक शिक्षण संचालक म्हणून कार्यरत होते. कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या १८५० शाळेमध्ये त्यांनी ई लर्निग सेवा उपलब्ध करून दिल्या. कोल्हापूर जिल्ह्यातील शाळा सिध्दी उपक्रमात ‘अ’ श्रेणीतील शाळांची सरासरी संख्या राज्यात अव्वल आणली.

हेही वाचा 

Back to top button