कोल्हापूर : दामदुप्पटीचा हव्यास, कमी काळात दामदुप्पट, तिप्पट नव्हे, तर चारपटही शिवाय गुंतवणुकीवर आलिशान कार, महागड्या दुचाकींचे गिफ्ट, फॅमिलीसमवेत फॉरेन टूर आणखी बरेच काही, प्रचंड भूलभुलैया… घसघशीत परतावा म्हणजे सोन्याचे अंडे देणारी कोंबडीच समजली जाते. जिल्ह्यात फसव्या कपन्यांचे अक्षरश: पेव फुटले आहे. कंपन्यांची सत्यता पडताळणी न करताच गुंतवणुकीसाठी रांगा लागल्याचे चित्र आहे. दामदुप्पटीवर गुंतवणूक केलेल्या हजारो गुंतवणूकदारांना 5 वर्षांत 15 हजार कोटींच्या रकमेवर पाणी सोडावे लागले आहे.