कोल्हापूर : निम्म्या शहराचा पाणीपुरवठा आज बंद राहणार

कोल्हापूर : निम्म्या शहराचा पाणीपुरवठा आज बंद राहणार

कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा : पुईखडी येथील सबस्टेशन दुरुस्तीसाठी महावितरणकडून सोमवारी वीजपुरवठा बंद राहणार आहे. त्यामुळे सोमवारी (दि. 11) ए, बी वॉर्ड आणि ई वॉर्डातील काही भागासह निम्म्या शहरातील पाणीपुरवठा बंद राहणार आहे. मंगळवारी अपुरा व कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे. या भागात पाणीपुरवठ्यासाठी महापालिकेने चार टँकर उपलब्ध केले आहेत.

शहरातील ए, बी वॉर्ड अंतर्गत मंगळवार पेठ, शिवाजी पेठ, मंगेशकर नगर, मिरजकर तिकटी, संभाजीनगर, मंडलिक वसाहत, तिकोणे गॅरेज, कीर्ती हौसिंग सोसायटी, कोळेकर तिकटी, पोतनीस बोळ, शाहू बँक परिसर, कोष्टी गल्ली, प्रॅक्टिस क्लब, वारे वसाहत, साळोखेनगर, बापूरामनगर, महाराष्ट्र नगर, सुर्वेनगर, प्रथमेश नगर, शिवगंगा कॉलनी, प्राध्यापक कॉलनी, वाल्मिकी आंबेडकर नगर, राधे कॉलनी, शांती उद्यान, इंगवले मळा, कात्यायनी कॉम्प्लेक्स, जरगनगर, गंजीमाळ, रामानंदनगर, नाळे कॉलनी, विजयनगर, जुनी मोरे कॉलनी, नवी मोरे कॉलनी, वर्षानगर, भारतनगर, सुभाषनगर पंपिंगवरील ग्रामीण भाग, पाचगाव, आर. के. नगर, पुईखडी, जिवबा नाना जाधव पार्क, विशालनगर, आयसोलेशन, वाय. पी. पोवार नगर, वर्षा विश्वास परिसर, शिवस्वरूप कॉलनी, पोस्टल कॉलनी, आर. के. नगर, जरगनगर ले आऊट

तसेच ई वॉर्ड अंतर्गत संपूर्ण राजारामपुरी, शाहू मिल परिसर, वैभव हौसिंग सोसायटी, ग्रीनपार्क, रेव्हेन्यू कॉलनी, अरुणोदय परिसर, राजेंद्रनगर, चौगुले हायस्कूल परिसर, सम्राटनगर, प्रतिभानगर, इंगळेनगर, दौलतनगर, उद्यमनगर, शास्त्रीनगर, पांजरपोळ, नवश्या मारुती चौक, दत्त गल्ली, यादवनगर, कामगार चाळ, पंत मंदिर परिसर, जगदाळे कॉलनी, महावीरनगर, अश्विनीनगर, जागृतीनगर, पायमल वसाहत, अंबाई डिफेन्स, राजाराम रायफल, काटकर माळ, लोणार वसाहत, शाहू मिल कॉलनी, राजीव गांधी वसाहत, महाडिक वसाहत, रुईकर कॉलनी, शिवाजी पार्क, फ्रेंडस् कॉलनी, शाहूपुरी व्यापारपेठ, शाहूपुरी 1 ते 4 गल्ली, साईक्स एक्स्टेन्शन, पाच बंगला परिसर आदी भागातील पाणीपुरवठा बंद राहणार आहे. उपलब्ध पाणी काटकसरीने वापरून सहकार्य करावे, असे आवाहन पाणीपुरवठा विभागाने केले आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news