निम्म्या कोल्हापूरचा पाणीपुरवठा उद्या बंद

निम्म्या कोल्हापूरचा पाणीपुरवठा उद्या बंद

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : पुईखडी येथील सबस्टेशन दुरुस्तीसाठी महावितरणकडून सोमवारी वीजपुरवठा खंडित केला जाणार आहे. त्यामुळे सोमवारी (दि. 11) कोल्हापूर शहरातील निम्म्या भागाचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. यात ए व बी वॉर्डसह ई वॉर्डातील काही भागांचा समावेश आहे. तसेच मंगळवारी अपुरा व कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे. मागणीनुसार पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यासाठी महापालिकेने चार टँकर उपलब्ध केले आहेत.

शहरातील ए, बी वॉर्ड अंतर्गत पाण्याचा खजिना वितरण शाखा, मंगळवार पेठ, शिवाजी पेठ, मंगेशकर नगर, मिरजकर तिकटी, संभाजीनगर, मंडलिक वसाहत, तिकोणे गॅरेज, कीर्ती हौसिंग सोसायटी, कोळेकर तिकटी, पोतनीस बोळ, शाहू बँक परिसर, कोष्टी गल्ली, प्रॅक्टिस क्लब, वारे वसाहत, साळोखेनगर, बापूरामनगर, महाराष्ट्र नगर, सुर्वेनगर, प्रथमेशनगर, शिवगंगा कॉलनी, प्राध्यापक कॉलनी, वाल्मिकी आंबेडकरनगर, राधे कॉलनी, शांती उद्यान, इंगवले मळा, कात्यायनी कॉम्प्लेक्स, जरगनगर, गंजीमाळ, रामानंदनगर, नाळे कॉलनी, विजयनगर, जुनी मोरे कॉलनी, नवी मोरे कॉलनी, वर्षानगर, भारतनगर, सुभाष नगर

पंपिंगवरील ग्रामीण भाग, पाचगाव, आर. के. नगर, पुईखडी, जिवबा नाना जाधव पार्क, विशालनगर, आयसोलेशन, वाय. पी. पोवार नगर, वर्षा विश्वास परिसर, शिवस्वरूप कॉलनी, पोस्टल कॉलनी, आर. के. नगर, जरगनगर लेआऊट तसेच ई वॉर्ड अंतर्गत संपूर्ण राजारामपुरी, शाहू मिल परिसर, वैभव हौसिंग सोसायटी, ग्रीन पार्क, रेव्हेन्यू कॉलनी, अरुणोदय परिसर, राजेंद्रनगर, चौगुले हायस्कूल परिसर, सम—ाटनगर, प्रतिभानगर, इंगळेनगर, दौलतनगर, उद्यमनगर, शास्त्रीनगर, पांजरपोळ, नवश्या मारुती चौक, दत्त गल्ली, यादवनगर, कामगार चाळ, पंत मंदिर परिसर, जगदाळे कॉलनी, महावीर नगर, अश्विनीनगर, जागृतीनगर, पायमल वसाहत, अंबाई डिफेन्स, राजाराम रायफल, काटकर माळ, लोणार वसाहत, शाहू मिल कॉलनी, राजीव गांधी वसाहत, महाडिक वसाहत, रुईकर कॉलनी, शिवाजी पार्क, फ्रेंडस् कॉलनी, शाहूपुरी व्यापारपेठ, शाहूपुरी 1 ते 4 गल्ली, साईक्स एक्स्टेंशन, पाच बंगला परिसर आदी भागातील पाणीपुरवठा बंद राहणार आहे. उपलब्ध पाणी काटकसरीने वापरून सहकार्य करावे, असे आवाहन महापालिकेने पत्रकाद्वारे केले आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news