पाडळी बुद्रुकमध्ये बिबट्याचे दर्शन | पुढारी

पाडळी बुद्रुकमध्ये बिबट्याचे दर्शन

शिगणापुर : पाडळी बुद्रुक (ता. करवीर) येथील मधला माळ परिसरात शुक्रवारी बिबट्याचे दर्शन झाले. यामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.

भैरवनाथ कळंत्रे व भरत कळंत्रे या मेंढपाळ बांधवांना शुक्रवारी दुपारी बिबट्या दिसल्यानंतर त्यांनी सरपंच शिवाजी गायकवाड व वरणगे उपसरपंच राजेंद्र पाटील, भिकाजी पाटील यांच्याशी संपर्क साधला. वनविभाग व वन्यजीव रक्षक दल यांची टीम व छत्रपती वाईल्ड लाईफ फाऊंडेशन यांनी त्याला जाळ्यात पकडण्याचा प्रयत्न केला. पण तो अयशस्वी झाला. कुत्र्यावर हल्ला केल्यानंतर बिबट्याचा आवाज इतका भीतीदायक होता की, दोन-अडीचशे मीटरवर जमलेल्या लोकांनी तत्काळ वन्यजीव रक्षक दलाच्या व्हॅनचा आधार घेतला.

Back to top button