कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा : शहरातील सर्व दुकानदारांनी मराठीमध्ये पाट्या लावाव्यात, असे आवाहन महापालिकेने पत्रकाद्वारे केले आहे. राज्य शासनाने सर्व दुकानदारांनी मराठी भाषेत नामफलक लावण्याच्या सूचना दिल्या आहेत.
आस्थापनेचा नामफलक मराठी देवनागरी लिपीत असावा आणि तो प्रारंभी लिहिणे आवश्यक असल्याचे नमूद आहे. इतर भाषेतही लिहू शकतात. मराठी अक्षराचा आकार इतर अक्षरांच्या आकारापेक्षा लहान असू नये, असे आवाहनही पत्रकात केले आहे.