कोल्हापूर: सरूड येथे मराठा समाजाचे साखळी उपोषण पूर्ववत सुरू | पुढारी

कोल्हापूर: सरूड येथे मराठा समाजाचे साखळी उपोषण पूर्ववत सुरू

सरूड : पुढारी वृत्तसेवा : सरुड (ता. शाहूवाडी) येथे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सकल मराठा समाजाने स्थगित केलेले साखळी उपोषण शुक्रवारी (ता. १) सकाळी पुन्हा पूर्ववत सुरू केले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या अर्धाकृती पुतळ्याचे गावचे प्रथम नागरिक भगवान नांगरे यांच्या हस्ते पूजन आणि पुष्पहार घालून आंदोलन सुरू करण्यात आले.

ग्रामपंचायत आवारातील ध्वजस्तंभाजवळ सकल मराठा समाजाच्या समन्वयकांसह समर्थक मंडळी साखळी उपोषणाला बसले होते. छत्रपती शिवाजी महाराजांचा नामघोष करीत ‘एक मराठा लाख मराठा’, ‘आरक्षण आमच्या हक्काचे.. नाही कुणाच्या बापाचे’ अशा घोषणा देण्यात आल्या.

यावेळी मराठा आरक्षणाचे संघर्ष योद्धा मनोज जरांगे-पाटील यांनी केलेल्या आवाहनाला अनुसरून १ डिसेंबर पासून साखळी उपोषण पुन्हा सुरू केल्याचे, तसेच पोलीस प्रशासनाला निवेदनाद्वारे अवगत केल्याचे मराठा समन्वयकांनी सांगितले. भाई भारत पाटील यांनी उपोषण स्थळी भेट दिली. यावेळी मनीष तडावळेकर, बळवंत पाटील, शामराव सोमोशी, सचिन पाटील, अक्षय चौगुले, बाबासो पाटील, अशोक पाडळकर, रमेश रोडे आदींसह मराठा समाजातील नागरिक उपस्थित होते.

हेही वाचा 

Back to top button