एड्स निर्मूलन दिन : सेक्स वर्करमध्ये एड्सचे प्रमाण निम्म्यावर

एड्स निर्मूलन दिन : सेक्स वर्करमध्ये एड्सचे प्रमाण निम्म्यावर

कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा : सेक्स वर्कर महिलांमध्ये अनेकदा असुरक्षित लैंगिक संबंधातून एचआयव्ही होण्याचा धोका अधिक असतो. मात्र, वारंवार होणार्‍या जनजागृतीमुळे सध्या हे प्रमाण घटले असल्याचे समोर आले आहे. सेक्स वर्कर महिलांमध्ये एड्सचे प्रमाण मागील दहा वर्षांत 13 टक्क्यांवरून 7.9 टक्क्यांपर्यंत घटले असून अतिजोखीम (हायरिस्क) गटातील एचआयव्हीच्या संख्येत गेल्या पाच वर्षांत तीव— प्रमाणात घट झाली आहे. विशेष म्हणजे यावर्षी ऑक्टोबरअखेर एकही सेक्स वर्कर महिला एचआयव्ही पॉझिटिव्ह नाही.

वारंवार होणार्‍या जनजागृतीमुळे, आजाराचे लवकर निदान, वेळेवर चाचणी आणि उपचार या सर्व बाबींमुळेे काही वर्षांत एड्सच्या प्रकरणांची संख्या कमी करण्यास मदत झाली असल्याची माहिती जिल्हा एड्स नियंत्रण कक्षातील अधिकार्‍यांनी दिली आहे. जिल्ह्यात सेक्स वर्कर महिलांसाठी जिल्हा एड्स नियंत्रण विभागाच्या नेतृत्वात इचलकरंजीमधील सेक्स वर्कर महिला एड्स मुकाबला परिषद आणि शहरातील सदर बझारमधील संग्राम म्हणजेच संपदा ग्रामीण विकास संस्था कार्यरत आहेत. या माध्यमातून महिला सेस्क वर्कर, समलैंगिक आणि ट्रान्सजेंडर या तीन वर्गवारीनुसार एड्स नियंत्रणासाठी काम केले जात आहे. 2013 मध्ये सर्वेक्षणातून 13 टक्के, 2016 मध्ये 11 टक्के सेक्स वर्कर महिलांचे एचआयव्हीबाधित होण्याचे प्रमाण होते. दरम्यान, तांत्रिक कारणास्तव सर्वेक्षण करण्यात आले नाही. सध्या 2023 मध्ये हेच प्रमाण 7.9 टक्क्यांपर्यंत कमी झाले आहे.

सतत आणि वेगवेगळ्या कार्यक्रमांदरम्यान केल्या जाणार्‍या शिबिरांमधून, उपक्रमांतून महिलांमध्ये जागृकतेचे प्रमाण वाढले आहे. परिणामी, जिल्ह्यात एचआयव्हीचा संसर्ग झालेल्या रुग्णांची संख्या कमी झाली आहे. गेल्या काही वर्षांत एचआयव्ही तपासणी केलेल्या रुग्णांची संख्या कमी करण्यासाठी लवकर निदान, वेळेवर उपचार या दोन्ही बाबी महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. – दीपा शिपूरकर, जिल्हा एड्स कार्यक्रम अधिकारी

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news