

कळे : पुढारी वृत्तसेवा : कळे-बाजारभोगाव मार्गावर साळवाडी (ता.पन्हाळा) जवळ एसटी बस व मोटरसायकल यांच्यात सोमवारी (दि.२७) सकाळी अकराच्या सुमारास समोरासमोर झालेल्या धडकेत गंभीर जखमी झालेल्या दुचाकस्वाराचा सीपीआरमध्ये उपचारादरम्यान मृत्यू झाला. सुभाष बापू सनगर (वय ५८) असे त्यांचे नाव असून अपघाताची नोंद कळे पोलीस ठाण्यात झाली आहे. Kolhapur News
याबाबत अधिक माहिती अशी, रंकाळा बस स्थानकातून चालक संतोष धोंडीराम सुतार हे एसटी बस (एमएच ०७ सी ७५६४) घेऊन मरळे (ता. शाहूवाडी) कडे निघाले होते. याचवेळी व्यवसायाने घोंगडी व्यावसायिक असलेले सुभाष सनगर (रा.किसरूळ) हे मोटारसायकलवरून ( एमएच ०९ जी ५६०६) कळे येथे घोंगडी विकण्यासाठी निघाले होते. साळवाडीजवळ आल्यावर या दोन्ही वाहनांची समोरासमोर धडक झाली. यामध्ये सुभाष सनगर यांच्या डोक्यास मार लागून ते गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी तातडीने सीपीआरला दाखल करण्यात आले. दुपारी चारच्या सुमारास उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. जखमी अवस्थेतील सुभाष सनगर यांना क त्याच्यावर उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला. त्यांच्या मागे पत्नी, मुलगा व विवाहित मुलगी असा परिवार आहे. Kolhapur News
हेही वाचा