ACB : लाच घेताना इचलकरंजी नगरपरिषदेचा अभियंता आणि पंटर ताब्यात | पुढारी

ACB : लाच घेताना इचलकरंजी नगरपरिषदेचा अभियंता आणि पंटर ताब्यात

इचलकरंजी, पुढारी वृत्तसेवा :

गुंठेवारी प्रकरणाचे काम पूर्ण करून देण्यासाठी २५ हजारांच्या लाचेची (ACB) मागणी करून त्यापैकी २० हजारांची लाच स्वीकारताना आज (मंगळवार) इचलकरंजी नगरपालिकेतील अभियंता आणि पंटरला रंगेहात पकडले आहे. (ACB)

लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने (ACB) याप्रकरणी इचलकरंजी नगरपालिकेतील नगररचना विभागाचे अभियंता बबन कृष्णा खोत (वय ५७, रा. नारायण मळा, इचलकरंजी) आणि खासगी इसम किरणकुमार विलास कोकाटे (वय ४६, रा. संत मळा, इचलकरंजी) या संशयितांना ताब्यात घेतले आहे. (Bribe)

याबाबत मिळालेली सविस्तर माहिती अशी की, यातील तक्रारदार यांच्या जमिनीच्या गुंठेवारी पोट विभागणीची फाईल इचलकरंजी नगरपरिषदेत प्रलंबित होती. त्या फाईलवर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी यांची सही घेऊन सदरचे प्रलंबित काम पूर्ण करून देण्यासाठी अभियंता खोत यांनी तक्रारदाराकडे २५ हजार रूपयांच्या लाचेची मागणी केली.

त्यानंतर झालेल्या तडजोडीत तक्रारदाराने २० हजार रुपये देतो असे सांगितले. आणि याबाबतची तक्रार कोल्हापूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे दाखल केली.

त्यानुसार आज पोलिसांनी इचलकरंजी नगरपरिषदेत सापळा रचून, अभियंता खोत व पंटर कोकाटे यांना रंगेहात पकडले.

ही कारवाई पोलीस उपअधीक्षक आदिनाथ बुधवंत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल शरद पोरे, पोलीस नाईक विकास माने, सुनिल घोसाळकर, पोलीस कॉन्स्टेबल मयुर देसाई, रुपेश माने यांनी केली.

एकीकडे पालिकेचे कर्मचारी आपल्या न्यायहक्कांसाठी कामबंद करून लढा देत आहेत तर दुसरीकडे बंद काळात लाच (Bribe) स्वीकारताना दोन अधिकाऱ्यांना अटक झाली त्यामुळे पालिकेत खळबळ उडाली.

Back to top button