कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठात शनिवारपासून राष्ट्रीय परिषद | पुढारी

कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठात शनिवारपासून राष्ट्रीय परिषद

कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा : शिवाजी विद्यापीठाच्या भौतिकशास्त्र अधिविभागामार्फत शनिवार, दि. 25 व 26 नोव्हेंबर या कालावधीत ‘नॅशनल कॉन्फरन्स ऑन फिजिक्स ऑफ मटेरिअल्स अँड मटेरिअल्स बेस्ड डिव्हाईस फॅब्रिकेशन 2023’ या विषयावर राष्ट्रीय परिषदेचे आयोजन केले आहे.

परिषदेचे उद्घाटन भौतिकशास्त्र अधिविभागाच्या सभागृहात दि. 25 रोजी सकाळी 10 वाजता कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. या परिषदेमध्ये मार्गदर्शन करण्याकरिता सेंटर फॉर मटेरिअल्स फॉर इलेक्ट्रॉनिक्स (सिमेट, पुणे), येथील माजी संचालक डॉ. डी. पी. अंमळनेकर, डॉ. एम. व्ही. कुलकर्णी तसेच भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्था (पुणे) येथील डॉ. मुहंमद मुस्तफा यांना निमंत्रित करण्यात आले आहे.

परिषदेमध्ये कॅटलिसिस, नॅनोमटेरिअल्स, सोलर सेल, सुपरकॅपॅसिटर, बॅटरी, बायोफिजिक्स, स्पेस अ‍ॅप्लिकेशन्स इत्यादी विषयांवर चर्चासत्र आयोजित करण्यात आलेले आहे. तसेच भारत सरकारच्या स्टार्टअप इंडिया या योजनेला अनुसरून तरुणांमधील उद्योजकतेला प्रोत्साहन देण्यासाठी या परिषदेअंतर्गत ‘इनोवेशन, आंत्रप्रिन्युअरशिप अँड एक्झिबिशन’ या विशेष सत्राचे आयोजन करण्यात आले आहे. या परिषदेसाठी 200 संशोधकांनी नोंदणी केली आहे. या परिषदेमार्फत देशातील तरुण संशोधक, शास्त्रज्ञ, तंत्रज्ञ व उद्योजकांना एकत्र येण्याची तसेच आपल्या संशोधन कार्याची देवाणघेवाण करण्याची संधी प्राप्त होणार आहे.

Back to top button