Kolhapur News | सीबीआय अधिकारी असल्याचे सांगून ६८ लाखांची फसवणूक

सीबीआयचा अधिकारी असल्याचे सांगून योगेंद्र रघुनाथ ठाकूर यांची ६८ लाख ५५ हजार ५५४ रुपयांची फसवणूक करण्यात आली.
68 lakh fraud by pretending to be a CBI officer in kolhapur
सीबीआय अधिकारी असल्याचे सांगून ६८ लाखांची फसवणूकPudhari File Photo
Published on
Updated on

कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा

सीबीआयचा अधिकारी असल्याचे सांगून योगेंद्र रघुनाथ ठाकूर (वय ५३, रा. स्वाती अपार्टमेंट, फिरंगाई तालीममागे, शिवाजी पेठ) यांची ६८ लाख ५५ हजार ५५४ रुपयांची फसवणूक करण्यात आली. कस्टम ऑफिसरने मुंबई विमानतळावर तुम्हाला आलेले पार्सल पकडले असून यात २०० ग्रॅम एमडीएम ड्रग्ज, पाच पासपोर्ट, ३ क्रेडिट कार्ड, कपडे, एक लॅपटॉप व भारतीय चलनातील ३५ हजार रुपये असल्याचे सांगून अनोळखी व्यक्तीने गंडा घातला.

68 lakh fraud by pretending to be a CBI officer in kolhapur
Delhi Bomb Threat | दिल्लीतील शाळेला पुन्हा बॉम्बस्फोटाची धमकी

अशा प्रकारे फसवणुकीची गेल्या दोन महिन्यांतील जिल्ह्यातील ही दुसरी घटना आहे. याबाबतची फिर्याद ठाकूर यांनी जुना राजवाडा पोलिस ठाण्यात दिली आहे. २२ ते २९ जून या कालावधीत अनोळखी व्यक्तीने मोबाईलवरून संपर्क करत कुरिअर कंपनीमधून अनिल गुप्ता बोलतोय, तुमच्या नावाने आलेल्या पार्सलमध्ये अमली पदार्थ आहेत, असे सांगितले.

यानंतर दुसऱ्या व्यक्तीने फोन करत सायबर क्राईम, मुंबई येथून विक्रमसिंग बोलतोय अस सांगून या प्रकरणाची चौकशी डीसीपी, मुंबई क्राईम ब्रँच करत आहे. तुमच्यावर ड्रग्ज व मनी लाँडरिंगची केस दाखल होऊन अटक होऊ शकते. आम्ही मदत करतो, असे सांगून ठाकूर यांच्या बँक खात्याची असेच इंटरनेट बँकिंगची माहिती घेतली.

68 lakh fraud by pretending to be a CBI officer in kolhapur
रोहित पवारांनी जामखेडला पळवलेले एसआरपीएफ केंद्र पुन्हा वरणगावात

यानंतर ठाकूर यांना व्हॉटस्अपवर सीबीआयचे पाटील व आरबीआयचे मॅथ्यू असे चौकशी करणार असल्याचे सांगितले. यानंतर ठाकूर यांना त्यांच्या बंगळूर येथील एसबीआय बँकेतून ५५ लाख ५५ हजार ५५५ रुपये व पंजाब नॅशनल बँक, कॅनॉट प्लेस,

दिल्ली या बँकेतील खात्यावर असणारे १२ लाख ९९ हजार ९९९ रुपये, असे एकूण ६८ लाख ५५ हजार ५४ रुपये आरटीजीएसद्वारे ट्रान्स्फर करायला लावले. याप्रकरणी फसवणूक झाल्याचे लक्षात येताच ठाकूर यांनी जुना राजवाडा पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news