कोल्हापूर: ‘स्वाभिमानी’च्या पदाधिकाऱ्यांची धरपकड, जिल्हाध्यक्ष वैभव कांबळे पोलिसांच्या ताब्यात | पुढारी

कोल्हापूर: 'स्वाभिमानी'च्या पदाधिकाऱ्यांची धरपकड, जिल्हाध्यक्ष वैभव कांबळे पोलिसांच्या ताब्यात

कासारवाडी: पुढारी वृत्तसेवा: ऊस दर आंदोलनाला हिंसक वळण लागल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांची पोलिसांनी धरपकड सुरू केली आहे. संघटनेचे जिल्हाध्यक्ष वैभव कांबळे यांना आज (दि.१५) सकाळी पेटवडगाव पोलिसांनी अटक केली आहे. यामुळे कार्यकर्त्यांनी पोलीस ठाण्यासमोर ठिय्या मांडला. Swabhimani Shetkari Sanghatana

कोल्हापूर, सांगलीसह सातारा जिल्ह्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिका-यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सोमवारी रात्री तळसंदे येथे ट्रॅक्टर पेटवल्याप्रकरणी स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष वैभव कांबळे व चार जणांना पेठ वडगाव पोलिसांनी त्यांच्या पारगाव (ता. हातकणंगले) येथून राहत्या घरातून ताब्यात घेतले आहे. त्यांना आज जामिनासाठी न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. Swabhimani Shetkari Sanghatana

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष व माजी खासदार राजू शेट्टी यांनी साखर कारखानदारांना दिलेल्या अल्टिमेटमचा आज शेवटचा दिवस आहे. आज राजू शेट्टी हे आंदोलनाची पुढील दिशा ठरवणार आहेत. आज सायंकाळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा हातकणंगले तालुक्यातील हुपरी येथे मेळावा होणार आहे. यासाठी जिल्ह्यातील कार्यकर्ते हुपरी येथे दाखल होणार आहेत.

हेही वाचा 

Back to top button