केएमटी कर्मचार्‍यांचा उद्यापासून संप | पुढारी

केएमटी कर्मचार्‍यांचा उद्यापासून संप

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : विविध प्रलंबित मागण्यांसाठी केएमटी कर्मचारी मंगळवारी (दि. 7) मध्यरात्रीपासून म्हणजे बुधवार (दि. 8) पासून संपावर जाणार आहेत. म्युनिसिपल ट्रान्स्पोर्ट वर्कर्स युनियनने महापालिका प्रशासनाला त्यासंदर्भात पत्र दिले आहे. युनियनचे अध्यक्ष निशिकांत सरनाईक यांनी ही माहिती दिली.

केएमटी कर्मचार्‍यांना सातवा वेतन आयोग लागू करा, रोजंदारी कर्मचार्‍यांना कायम करा, नवीन दुरुस्त केलेल्या वेळापत्रकाची अंमलबजावणी करा आदीसह इतर मागण्यांसाठी कर्मचारी संपावर जाणार आहेत, असेही सरनाईक यांनी सांगितले.

Back to top button