कोल्हापूर : मनपाच्या घरफाळा विभागाचे दोन लिपिक लाच घेताना जेरबंद | पुढारी

कोल्हापूर : मनपाच्या घरफाळा विभागाचे दोन लिपिक लाच घेताना जेरबंद

कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा : नव्याने खरेदी केलेल्या घराच्या मालकी हक्काच्या नोंदीसाठी साडेतीन हजारांची लाच घेताना मनपाच्या राजारामपुरी विभागीय कार्यालय क्रमांक 3 मधील घरफाळा विभागातील दोघा मुकादम तथा लिपिकांना लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने गुरुवारी रंगेहाथ अटक केली. शेखर अरुण पाटील (वय 26, रा. मंगळवार पेठ, शाहू बँकेजवळ) व रोहित विनायक जाधव (32, तस्ते गल्ली, मारुती मंदिराजवळ, मंगळवार पेठ) अशी त्यांची नावे आहेत. दरम्यान, या कारवाईमुळे काही क्षणात विभागीय कार्यालयात सन्नाटा पसरला. कारवाईच्या धास्तीने अधिकारी, कर्मचार्‍यांनी धूम ठोकली.

संशयितांच्या घरांची झडती!

संशयितांविरुद्ध राजारामपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, रात्री उशिरा त्यांना अटक करण्यात आल्याचे ‘एसीबी’चे पोलिस उपअधीक्षक सरदार नाळे यांनी सांगितले. संशयितांच्या घKolhapur: Two clerks of Gharphala department of municipality arrested for taking bribeरांची रात्री उशिरापर्यंत तपासणी सुरू होती. दोघांना शुक्रवारी न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.

नोंदीसाठी लिपिकाकडून टाळाटाळ

मंगळवार पेठ येथील तक्रारदार व्यक्तीने काही दिवसांपूर्वी राजारामपुरी परिसरात नव्याने घर खरेदी केले आहेे. घरावर मालकी हक्काच्या रीतसर नोंदीसाठी त्यांनी घरफाळा विभागाकडे अर्ज दाखल केले. त्याची रीतसर फीदेखील अदा केली. मात्र, संबंधित विभागातील मुकादम तथा लिपिक शेखर पाटील व रोहित जाधव यांनी जाणीवपूर्वक टाळाटाळ सुरू केली होती.

मागणी 5 हजारांची; सौदा साडेतीन हजारांचा!

तक्रारदारांनी लिपिकांची भेट घेऊन विनवणी केली असता संशयितांनी 5 हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली. तडजोडीअंती साडेतीन हजारांवर सौदा ठरला. तक्रारदार व्यक्तीने ‘एसीबी’कडे तक्रार केली. पथकाने केलेल्या पडताळणीतही तथ्य आढळून आल्याने गुुरुवारी सायंकाळी घरफाळा विभागात सापळा रचून दोघांना लाचेची रक्कम घेताना पथकाने ताब्यात घेतले.

वादग्रस्त घरफाळा विभाग पुन्हा चर्चेत

संशयित पाटील व जाधव यांना अनुकंपा तत्त्वावर दोन वर्षांपूर्वी मनपा सेवेत कायमस्वरूपी सामावून घेण्यात आले आहेे. आर्थिक गैरव्यवहारामुळे घरफाळा विभाग नेहमीच चर्चेत असतो. त्याच विभागातील दोन कर्मचारी लाचखोरीच्या प्रकरणात जेरबंद झाल्याने घरफाळा विभागातील कारभार पुन्हा चव्हाट्यावर आला आहे.

Back to top button