Kolhapur Rain | गेल्या २४ तासांत जिल्ह्यात ६७ टक्के पाऊस, 'या' तालुक्यात सर्वाधिक

चंदगडमध्ये सर्वात कमी ३२.७ मि.मी पाऊस
Kolhapur Rain : Panchganga River is moving towards danger level
Kolhapur Rain : पंचगंगा नदीची धोका पातळीकडे वाटचालPudhari Photo

पुढारी ऑनलाईन डेस्क: जिल्ह्यात अनेक ठिकाणी धुंवाधार पाऊस सुरुच आहे. या पार्श्वभूमीवर गेल्या २४ तासात कोल्हापूर जिल्ह्यात एकूण ६७ टक्के पाऊस पडला आहे. यामध्ये सर्वात जास्त १२३.८ मि.मी पाऊस शाहुवाडी तालुक्यात पडला आहे, अशी माहिती कोल्हापूर प्रशासनाने दिली आहे.

सर्वात कमी चंदगडमध्ये ३२.७ मि.मी पाऊस

गेल्या २४ तासांत शाहुवाडीनंतर, रत्नागिरीत - ९४.४ मि.मी, पन्हाळा - ९१.९मि.मी, हातकणंगले-७१.६ मि.मी, आजरा - ६८.८ मि.मी, करवीर-कोल्हापूर - ६७.७ मि.मी, भुदरगड-६५.२ मि.मी, गडहिंग्लज- ४९.६ मि.मी, शिरोळ-४४ मि.मी, कागल-४१.७ मि.मी, गगनबावडा-३९.५ मि.मी, चंदगड-३२.७ मि.मी असा एकूण ६७ टक्के पाऊस झाल्याचे देखील प्रशासनाने म्हटले आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news