बिद्री साखर कारखाना निवडणूकीसाठी पहिल्याच दिवशी ११३ उमेदवारी अर्ज दाखल

बिद्री साखर कारखाना निवडणूकीसाठी पहिल्याच दिवशी ११३ उमेदवारी अर्ज दाखल

बिद्री :  बिद्री येथील श्री दूधगंगा वेदगंगा सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणूकीसाठी आज गुरुवार ( दि. २६) पासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे. पहिल्याच दिवशी कारखान्याचे अध्यक्ष के. पी. पाटील यांच्यासह विद्यमान संचालक व प्रमुख कार्यकर्त्यांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले. काही उमेदवारांनीनी वाजत-गाजत अर्ज दाखल करताना शक्तीप्रदर्शन केले. निवडणूकीच्या विविध गटातून ९० तसेच दुबार २३ असे ११३ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. आतापर्यंत ७५३ उमेदवारी अर्जाची विक्री झाली आहे.

'बिद्री' ची निवडणूक ३ डिसेंबरला होत असून गुरुवारपासून उमेदवारी अर्ज भरण्यास प्रारंभ झाला आहे. निवडणूक निर्णय अधिकारी अरुण काकडे यांनी विभागवार अर्ज भरण्यासाठी वेगवेगळी दालने करून अधिकृत अधिकाऱ्यांमार्फत उमेदवारी अर्ज स्विकारले जात आहेत. अर्ज भरण्याचा पहिल्याच दिवसाचा मुहुर्त साधून कारखान्याचे अध्यक्ष के. पी. पाटील यांच्यासह कांही विद्यमान संचालक गणपतराव फराकटे, प्रवीणसिंह पाटील, बाबासाहेब पाटील, उमेश भोईटे, सौ. निताराणी सूर्यवंशी, सुनिलराज सूर्यवंशी, माजी संचालक के. जी. नांदेकर यांच्यासह माजी जिल्हा परिषद सदस्य भूषण, मनोज फराकटे, शिवसेनेचे प्रकाश पाटील, बाबा नांदेकर यांच्यासह प्रमुखांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. उमेदवारी अर्ज भरण्यास १ नोव्हेंबरपर्यंत मुदत आहे. इच्छुकांची संख्या पहाता
उमेदवारी अर्ज भरण्यास झुंबड उडणार आहे.

तालुकावार कार्यक्षेत्राचे उत्पादक सात गट आहेत. तर राखीव पाच मतदार संघ आहेत.

गटवार उमेदवारी दाखल अर्ज असे : कार्यक्षेत्र तालुका (कंसात उमेदवारी दाखल अर्ज) व कंसाबाहेर दुबार अर्ज संख्या अशी :
राधानगरी : गट क्र. १ (१२ ) दुबार अर्ज – ४, गट क्र. २ ( १४) दुबार- ३.
कागल : गट क्र. ३ ( १६ ) दुबार- ४,
गट क्र. ४ ( १३ ) दुबार-४,
भुदरगड : गट क्र. ५ ( ७ ) दुबार -१, गट क्र. ६ ( १०) दुबार-३,
करवीर : गट क्र. ७ ( ४ ) दुबार – ०

राखीव जागा गट :

महिला राखीव मतदार संघ ( २२ ) दुबार-३,
इतर मागास मतदार संघ ( १२ ) दुबार-००,
अनुसुचित जाती-जमाती मतदार संघ (०१) दुबार -०,
भटक्या विमुक्त मतदार संघ ( २) दुबार -१ अर्ज दाखल झाले आहेत.

हेही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news