Kolhapur accident : आपटेनगरात भरधाव कारने दोन वाहनांना ठोकरले; चार जखमी | पुढारी

Kolhapur accident : आपटेनगरात भरधाव कारने दोन वाहनांना ठोकरले; चार जखमी

कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा : भरधाव वेगाने जाणार्‍या मोटारीने दोन वाहनांना जोराची धडक दिल्याने झालेल्या अपघातात एका दाम्पत्यासह चौघे जखमी झाले आहेत. मंगळवारी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास हा अपघात कळंबा ते फुलेवाडी रिंगरोडवर आपटेनगर येथे झाला. याबाबत मोटारीचा चालक सर्जेराव धनाजी करपे (रा. आर.के.नगर) याच्याविरोधात जुना राजवाडा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी राहुल राजाराम पोवार (रा. शेंडूर, ता. कागल) यांनी जुना राजवाडा पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे. राहुल पोवार, राजवर्धन रघुनाथ बावडेकर, तृप्ती राजवर्धन बावडेकर (रा. कणेरकरनगर), दत्तात्रय मोरे (रा. आपटेनगर) अशी जखमींची नावे असून, त्यांच्यावर खासगी रुग्णालयांत उपचार सुरू आहेत.

मंगळवारी सायंकाळी सातच्या सुमारास सर्जेराव करपे हा मोटारीतून रिंगरोडवरून कळंबा ते फुलेवाडी या दिशेने भरधाव वेगाने
जात होता. अत्यंत निष्काळजीपणे तो वाहन चालवत होता. काही वेळा तो चुकीच्या बाजूनेही मोटार चालवत होता. याचवेळी दोन वाहनांना त्याने धडक दिल्याने चौघे जखमी झाले. अपघातानंतर करपे न थांबता घटनास्थळावरून मोटारीने निघून गेला. दरम्यान, याप्रकरणी जखमी राहुल पोवार यांनी तत्काळ जुना राजवाडा पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी मोटार ताब्यात घेऊन गुन्हा दाखल केला.

हेही वाचा :

Back to top button