कोल्हापूर : शस्त्राच्या धाकाने दहशत; पोलिस दाम्पत्य निलंबित | पुढारी

कोल्हापूर : शस्त्राच्या धाकाने दहशत; पोलिस दाम्पत्य निलंबित

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : किरकोळ वादातून हातात धारदार शस्त्र घेऊन शिवीगाळ करत दहशत माजविल्याप्रकरणी कोल्हापूर पोलिस दलातील दाम्पत्यावर शनिवारी निलंबनाची कारवाई केली. आशुतोष वसंत शिंदे व रेश्मा आशुतोष शिंदे, अशी त्यांची नावे आहेत. पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी ही कारवाई केली असून, त्यांच्या खातेनिहाय चौकशीचे आदेशही दिले आहेत.

पाचगाव येथील गाडगीळ कॉलनीत कॉन्स्टेबल आशुतोष, त्याची पत्नी रेश्मा शिंदे राहतात. त्यांच्या शेजारी विनोदकुमार वावरे (वय 40) हे राहतात. सोमवारी (दि. 16) रात्री किरकोळ कारणातून त्यांच्यात वादावादी झाली. वादात समेट करण्यासाठी आलेल्या वावरे यांच्यासह त्यांच्या नातेवाइकांना शिंदे दाम्पत्याने शिवीगाळ केली.

त्याच दिवशी रात्री उशिरा कॉन्स्टेबल आशुतोष शिंदे याने हातात धारदार शस्त्र घेऊन दहशत माजविण्याचा प्रयत्न केला; तर त्याच्या पत्नीने शिवीगाळ केली. वावरे यांनी याबाबत करवीर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केल्यानंतर पोलिस अधीक्षक पंडित यांनी घटनेची दखल घेत पती, पत्नीवर निलंबनाची कारवाई केली. आशुतोष शिवाजीनगर येथे, तर पत्नी शाहूपुरी पोलिस ठाण्यात कार्यरत आहेत.

Back to top button