चार दिवसांत सोने- चांदीत हजाराने वाढ | पुढारी

चार दिवसांत सोने- चांदीत हजाराने वाढ

कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा

लग्नसराईचा हंगाम सुरू होत असल्याच्या पार्श्वभूमीवर गुरुवारी सोने-चांदी दरात वाढ झाली. रविवारपासून आजअखेर जीएसटीसह प्रति तोळा सोन्याचा दर 1 हजार 100 तर प्रतिकिलो चांदी दर 2 हजार 100 रुपयांनी वाढले आहेत. गुरुवारी 50 हजार 600 रुपये सोने दर होता तर चांदी दर 66 हजार 500 रुपये होता.

जागतिक अर्थव्यवस्था आणि शेअर बाजाराचा सोन्या चांदीच्या दरावर परिणाम होतो. सध्या शेअर बाजारात चढ-उतार असल्याने त्याचा परिणाम दरावर झाल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले. असे असले तरीही सराफ बाजारात ग्राहकांची गर्दी कायम आहे. गतवर्षी कोरोनामुळे साधेपणाने लग्न समारंभ झाले. यंदा काहीसा दिलासा मिळाल्यामुळे अनेकजण दरवाढ होऊनही सुवर्णखरेदी करतानाचे चित्र सराफ पेढ्यांवर पाहायला मिळते आहे.

Back to top button