Drug racket : राज्याला बॉलीवूडमधूनच ड्रग्ज डोस ! | पुढारी

Drug racket : राज्याला बॉलीवूडमधूनच ड्रग्ज डोस !

कोल्हापूर : सुनील कदम; नाशिकच्या ललित पाटील याच्या अटकेनंतर राज्यातील ड्रग्ज रॅकेटचा हळूहळू पर्दाफाश होऊ लागला आहे. पण राज्याला खऱ्या अर्थाने ड्रग्जची ओळख कोण करून दिली असेल, तर ती बॉलीवूडने आणि राज्यातील युवापिढीला ड्रग्जची चटक लावण्यातही बॉलीवूडचा फार मोठा हात आहे, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. आज राज्यात ड्रग्जचे वेगवेगळे डझनावारी प्रकार प्रचलित झाले असून, महानगरांपासून ते अगदी पार ग्रामीण भागापर्यंत हे लोण पसरलेले दिसत आहे. (Drug racket)

प्रकार-स्वरूप वेगवेगळे

गेल्या काही वर्षात महाराष्ट्रात फोफावत असलेल्या अमली पदार्थांचे स्वरूप आणि प्रकारही वेगवेगळे आहेत. नैसर्गिक आणि प्रक्रियाकृत असे अली पदार्थाचे दोन प्रकार आहेत. नैसर्गिक अमली पदार्थामध्ये प्रामुख्याने अफू, चरस आणि गांजा यांचा समावेश होतो. अफू अफगाणिस्तान, पाकिस्तानमधून गुजरात राजस्थान मार्गे, तर चरस जम्मू- काश्मीरमधून येतो. गांजासाठी कुठे बाहेर जायची गरज नाही. कारण महाराष्ट्रातच गांजाची आगारेच्या आगारे आढळून येतात.

Drug racket : परदेशातून येणारे ड्रग्ज

प्रक्रियाकृत अमली पदार्थांमध्ये प्रामुख्याने हेरॉईन ब्राऊन शुगर, सिथेटिक ड्रज, केटामाईन, मॅफेड्रॉन, एम्फेटामाईन, कॅथिनॉन या अमली पदार्थांचा समावेश होतो. या अमली पदार्थांची उगमस्थाने प्रामुख्याने परदेशात आहेत; मात्र गेल्या काही वर्षात सांगली, नाशिक, सोलापूर, औरंगाबाद भागातील काही ड्रग्ज माफियांनी हे ड्रग्ज तयार करण्यातही प्रावीण्य मिळविल्याचे दिसून येत आहे. पावडर, गोळ्या, द्रवरूप, वायुरूप स्वरूपात हे अमली पदार्थ मिळतात. मात्र, त्याच्या किमती चार ते पाच हजार रुपये ग्रॅम अशा असल्याने हे अमली पदार्थ सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेरचे ठरतात. पण, उच्चभ्रू वर्गातील अनेक युवक या अमली पदार्थाचा शौक करताना दिसतात.

‘मॅफेड्रॉन’ स्वस्तात मस्त!

गेल्या काही दिवसांत सर्वसामान्य समाजातील आणि खेड्या-पाड्यातील युवापिढी मोठ्या प्रमाणात मॅफेड्रॉन या अमली पदार्थांच्या जास्त आहारी जात असलेली दिसत आहे. हजार-पाचशे रुपयांपासून याच्या किमती सुरू होत असल्याने सर्वसामान्य कुटुंबातील युवकालाही त परवडू शकते.

Drug racket : लक्षणे- अवलक्षणे

कोणत्याही अमली पदार्थांच्या आहारी जाणाऱ्यांमध्ये जवळपास सारखीच लक्षणे दिसू लागतात. या अमली पदार्थांची चटक लागलेली व्यक्ती सुरुवातीला काही दिवस सतत उत्साही दिसते; पण नंतर अवघ्या काही दिवसांतच त्या व्यक्तीची झोप व भूक गायब होते, हाडाची काडे होताना दिसू लागतात, कायम चिडचिड, रागावून कुणावरही भडकणे, सततची डोकेदुखी अचानक रक्तदाब वाढणे किंवा कमी होणे, ताप येऊन धाप लागणे आणि अचानकपणे अंग गार पडणे अशी लक्षणे दिसू लागतात.

दाऊदचा वरचष्मा

कुख्यात दहशतवादी दाऊद इब्राहिम आज पाकिस्तानात दडून बसला असला, तरी त्याचे इथले गुन्हेगारी साम्राज्य पूर्णपणे लयाला गेलेले नाही. चित्रपट सृष्टीतील अनेकजण आजही त्याच्याच तालावर नाचतात. गुन्हेगारी क्षेत्रांप्रमाणेच मुंबईसह देशभरातील ज विश्वावरही दाऊदचाच वरचष्मा आहे. त्याच्या स्वतःच्या नेटवर्कच्या माध्यमातूनच बॉलीवूडला ड्रग्ज पुरवठा होतो. या माध्यमातून बॉलीवूडवाले वर्षाकाठी जवळपास शे-पाचशे कोटी रुपये दाऊदच्या खिशात घालताना. दिसतात. त्यामुळे मुंबई पोलिस आण एनसीबीने बॉलीवूडपासून मूळ धरलेल्या ड्रग्ज रॅकेटची राज्यभरातील पाळेमुळे खणून काढण्याची गरज आहे; अन्यथा ही विषवल्ली फोफावण्याचा धोका आहे.

आयटम, व्हिलन आणि दो गड्डी, बक्सा !

बॉलीवूडमधील कलाकारांना ड्रग्ज मिळविण्यासाठी फारसे प्रयास करावे लागत नाहीत. कारण, अनेक ज्युनिअर कलाकार आणि स्पॉट बॉईज हे त्यांना हवे ते ड्रग्ज घरपोच देण्यासाठी सदैव तत्पर असतात. या लोकांचे मुख्य ड्रग्ज सप्लायरशी थेट संबंध असतात. त्यांच्याकडून योग्य किमतीत ड्रग्ज मिळवून ते दसपट भावाने बॉलीवूड कलाकारांच्या गळ्यात मारून या मंडळींची चांगली वरकमाई होते. याशिवाय अनेक कलाकारांनी केवळ याच कामासाठी आपल्या दफ्तरी काही खास लोक बाळगल्याचेही दिसून येते. बॉलीवूड कलाकार आणि त्यांना ड्रग्ज पुरवठा करणारे दलाल नेहमी कोडवर्डचा वापर करतात, त्यामुळे त्यांचे या बाबतीतील संभाषण किंवा संदेश सहजासहजी ओळखता येत नाहीत. आयटम, गोरी मॅम, हमलावर, सुपर हीरो, व्हिलन, सायनिंग अमाऊंट अशासारखे कोडवर्ड araगळ्या ड्रग्जसाठी वापरण्यात येतात. शिवाय ते पुरविणाऱ्या एजंटांसाठी वेगवेगळी आभासी नावे निश्चित केलेली असतात. पैशासाठीही रकमेनुसार एक गड्डी, दो गड्डी, आधा खोका, बक्सा अशी नावे वापरली जातात.

हेही वाचा 

Back to top button