‘पुढारी दसरा-दिवाळी शॉपिंग फेस्टिव्हल’ : रविवार ठरला ‘शॉपिंग संडे’

पुढारी दसरा-दिवाळी शॉपिंग फेस्टिव्हल
पुढारी दसरा-दिवाळी शॉपिंग फेस्टिव्हल
Published on
Updated on

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : दै. 'पुढारी' आयोजित 'दसरा-दिवाळी शॉपिंग फेस्टिव्हल 2023'मध्ये रविवार रेकॉर्डब्रेक गर्दीचा ठरला. यामध्ये गृहिणींचे प्रमाण अधिक होते. सर्वच ग्राहकांनी कुटुंबासमवेत भेट देऊन शॉपिंग संडेचा आनंद लुटला. रॉनिक स्मार्ट वॉटर हीटर आणि जय किसान शक्ती आटा चक्की या फेस्टिव्हलचे सहप्रायोजक आहेत.

रविवारमुळे विक्रमी गर्दी

दसरा, दिवाळीला नवीन कपडे, घर सजावटीच्या वस्तू, वाहने खरेदी करण्यासाठी या मुहूर्तांची लोक वाट पाहत असतात. तीच संधी 'पुढारी शॉपिंग फेस्टिव्हल'ने दिली आहे. गृहिणींनी गृहोपयोगी वस्तू, मसाल्याचे पदार्थ या दालनात तुडुंब गर्दी केली होती. आटाचक्की, रोटी मेकर्स, किचन ट्रॉली, सौंदर्य प्रसाधने, कपडे, गृह सजावटीच्या वस्तू, पर्सनल केअर, अशा वस्तू खरेदी करुन त्यावरील ऑफरचा त्यांनी लाभ घेतला. सजावटीच्या वस्तू, सौंदर्य प्रसाधने याचीही त्यांनी जोरदार खरेदी केली. सर्व प्रमुख शोरूमच्या दुचाकी आणि चारचाकी वाहने एकाच छताखाली पाहण्याची आणि बुकिंगची संधी अनेक कोल्हापूरकरांनी आज घेतली. वाहनांच्या दालनामध्ये गर्दी झाली होती.

दसरा-दिवाळी फेस्टिव्हलसाठी खास ऑफर्स

प्रवीण मसालेवाले यांच्या स्टॉलवर विविध मसाल्यांवर सवलत ऑफर आहेत. त्यामध्ये पनीर मसाले, पापड, लोणची याच्यावर मोठ्या सवलतीचे कॉम्बो ऑफर आहेत. तर विविध प्रकारचे मसाले 180 रुपयाला चार पॅकेट्स अशी ऑफर आहे. गुलाबजामून मिक्स 1 वर 1 फ्री देण्यात आले आहे. राम बंधू मसाले यांनी चायनीज सॉस, लोणची पापड, हिंग ही उत्पादने एकवर एक फ्री देऊ केली आहेत. खास दिवाळीनिमित्त चकली मसाला, भाजणी पापड या पदार्थांवर आकर्षक ऑफर ठेवल्या आहेत. काटदरे मसाले यांनी मिरची पावडर, हळद पावडर यांच्या अर्ध्या किलोच्या पॅकवर 65 रुपयांपासून 105 रुपयांपर्यंत सवलत ठेवली आहे. कोजागिरीनिमित्त दूध मसाल्यावर 100 ला चार अशी ऑफर ठेवली आहे.

चहा, गूळ, बेकरी पदार्थांवर ऑफर

वाघबकरी चहाच्या स्टॉलवर खास 'पुढारी फेस्टिव्हल'मधील ग्राहकांसाठी 1 किलो, अर्धा किलो वाघबकरी प्रीमियम चहावर 50 ते 100 रुपये सूट देण्यात आली आहे. साखर आणि प्लास्टिक कंटेनर मोफत देण्याच्या ऑफरही आहेत. सुशिदा टीने गुळाच्या रेडीमिक्स चहाचे पॅकेट एकावर एक मोफत देण्याची ऑफर आहे. न्युट्रीवेल जॅगरी यांनी देखील गुळाच्या फ्लेव्हर्स कँडी, उपासाची राजगिरा बिस्किटे, गुळाची चॉकलेट्स असे पदार्थ उपलब्ध केले आहेत. मालपानी ग्रुपने प्रत्येक उत्पादनावर 25 टक्के डिस्काऊंट दिला आहे. पापडी, बाकरवडी, चकली, कडबोळी आणि क्रिमरोल या पदार्थांवर ही ऑफर आहे.

सुजाता साडी : दोन साडीवर एक साडी फ्री, काठपदर 1 हजारात दोन, रेग्युलर साडी : पाचशेत दोन, अशी ऑफर ठेवली आहे. ओशियन फॅब या फॅक्टरी आऊटलेटने फिनीश फॅब्रिक आणि रेडीमेड शर्टस् होलसेल आणि रिटेल दरात उपलब्ध केले आहेत.

सुमंगल मार्केटिंगची कॅश काऊंटिंग मशीन दोन वर एक फ्री देण्यात येत असून सीआयएस मशीन वर प्रिंटर फ्री देण्यात येत आहे. एलिकाच्या चिमनी आणि हॉब्ज, कूक टॉपवर 65 टक्केपर्यंत सवलत आहे. रिएल ग्रुपने घरगुती तेलघाणा या मशीनवर सुमारे 4000 रुपयांची 'पुढारी' फेस्टिव्हल सवलत ठेवली आहे.स्मार्टकिड्स मुलांसाठींची विविध रोबोटिक मॉडेल्स ठेवली असून प्रत्येक प्रकारातील मॉडेल्सवर 1 हजारपर्यंत ऑफर ठेवली आहे. स्मार्ट किड अ‍ॅबॅकस लर्निंगसाठी क्लास बुकिंगवर 500 रुपये सवलत, तसेच फ्रँचायजी बुकिंगवर आकर्षक गिफ्ट दिले आहेत. डीएचपीची फुल्ल बॉडी मसाज चेअर ही प्रदर्शनातील एक आकर्षण आहे. पुढारी फेस्टिव्हलमध्ये बुक केल्यास यावर शेष ऑफर आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news