कोल्‍हापूर : गाय दूध दरवाढीसाठी ‘मनसे’ च्या कार्यकर्त्यांकडून ‘गोकुळ’ च्या बिद्री-बोरवडे शितकरण कार्यालयाची तोडफोड | पुढारी

कोल्‍हापूर : गाय दूध दरवाढीसाठी 'मनसे' च्या कार्यकर्त्यांकडून 'गोकुळ' च्या बिद्री-बोरवडे शितकरण कार्यालयाची तोडफोड

बिद्री ; पुढारी वृत्तसेवा कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ (गोकुळ) ने गायीच्या दूध दरात कपात केल्याच्या कारणावरून ‘मनसे’च्या कार्यकर्त्यांनी कागल तालुक्यातील बिद्री-बोरवडे दूध शितकरणात शिरुन पोलीसांच्या उपस्थित कार्यालयाची तोडफोड केली. या मध्ये ‘गोकुळ’ चे तीन ते चार अधिकारी खिडक्यांच्या काचा उडल्‍याने जखमी झाले. याबाबत मूरगूड पोलीसात गुन्हा नोंद झाला असून, आदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांना पोलीसांनी ताब्यात घेतले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, चार दिवसांपूर्वी ‘गोकुळ’ ने गाय दूध दरवाढ करावी. असे निवेदन ‘मनसे’ चे जिल्हाध्यक्ष युवराज येडूरे व कार्यकर्त्यांनी ‘गोकुळ’ प्रशासनाला दिले होते. आज (शनिवार) सकाळी ‘मनसे’ चे कार्यकर्त्यांनी ‘गोकुळ’ च्या बिद्री-बोरवडे शितकरण केंद्राच्या गेटवर आंदोलन करून घोषणाबाजी केली. पोलीसांनी याबाबत चार ते पाच प्रमुख कार्यकर्त्यांना आत बोलावून चर्चेसाठी शितकरण केंद्र प्रमुख विजय कदम यांच्या कार्यालयात चर्चेसाठी बोलावले.

चर्चा सुरु असताना गाय दूध दरवाढ मिळालीच पाहिजे. अशी मागणी करीत कार्यकर्त्यांनी हातात असलेल्या झेंड्याच्या काठ्यांनी तोडफोड करण्यास सुरुवात केली. यामध्ये कार्यालयाच्या खिडकीच्या काचा, टेबलावरची काच, संगणकाची मोडतोड केली. त्याच्या काचा उडून तीन ते चार कर्मचारी जखमी झाले.

पोलीसांच्या उपस्थित झालेली तोडफोड याबाबत आश्चर्य व्यक्त होत आहे. मुरगूड पोलीसात याबाबत फिर्याद दाखल झाली असून, आंदोलकांना ताब्यात घेवून गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू आहे.

हेही वाचा : 

Back to top button