कोल्‍हापूर : टिपू सुलतानचा स्टेटस ठेवणार्‍याला कसबा बावड्यात जमावाचा चोप | पुढारी

कोल्‍हापूर : टिपू सुलतानचा स्टेटस ठेवणार्‍याला कसबा बावड्यात जमावाचा चोप

कसबा बावडा, पुढारी वृत्तसेवा : टिपू सुलतानचा स्टेटस ठेवल्याबद्दल कसबा बावडा येथे तरुणाला जाब विचारत शुक्रवारी रात्री जमावाने बेदम मारहाण केली. तो तरुण घराकडे पळून जात असताना त्याचा पाठलाग करून त्याच्या दारातही जमावाने त्याला झोडपत घरावर दगडफेक केली.

घटनेची माहिती मिळताच शाहूपुरी पोलिस घटनास्थळी दाखल झाले. जमावाने संबंधिताला अटक करून त्याच्यावर कायदेशीर कारवाई करा, अशी मागणी करत रस्त्यावर ठिय्या मारण्याचा प्रयत्न केला. या प्रकाराने तणाव निर्माण झाला.

दरम्यान, पोलिसांनी संबंधित तरुणाला ताब्यात घेतले आहे. गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया शाहूपुरी पोलिसांत रात्री उशिरापर्यंत सुरू होती. संबंधित तरुणाच्या घरासमोर मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. शहर पोलिस उपाधीक्षक अजित टिक्के, शाहूपुरी पोलिस निरीक्षक अजय सिंदकर यांच्यासह अधिकार्‍यांनी घटनास्थळी भेट देऊन बंदोबस्तावरील पोलिसांना सूचना केल्या. परिसरात तणावपूर्ण वातावरण होते.

Back to top button