डॉ. प्रतापसिंह जाधव यांचे शिवभक्तांकडून अभिनंदन | पुढारी

डॉ. प्रतापसिंह जाधव यांचे शिवभक्तांकडून अभिनंदन

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : वाघनखांबाबत खरी माहिती दिल्याबद्दल शिवभक्तांकडून दै. ‘पुढारी’चे मुख्य संपादक डॉ. प्रतापसिंह जाधव यांचे अभिनंदन करण्यात आले. डॉ. जाधव यांच्या अभिनंदनाचे मेसेज सोशल मीडियातून व्हायरल होत आहेत. सोशल मीडियावर डॉ. जाधव यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव सुरू आहे.

राज्य शासनाकडून लंडन येथील व्हिक्टोरिया आणि अल्बर्ट वस्तुसंग्रहालयातील वाघनखे राज्यात आणली जाणार आहेत. मात्र, या वस्तुसंग्रहालयातील वाघनख्यांवरून उलटसुलट चर्चा सुरू आहे. या पार्श्वभूमीवर लंडनच्या संग्रहालयातील वाघनखे छत्रपती शिवरायांचीच असल्याचे डॉ. जाधव यांनी पुराव्यानिशी स्पष्ट केले आहे. डॉ. जाधव यांनी ‘पुढारी न्यूज’वर मुलाखत देताना हे पुरावेही सादर केले. याचबरोबर दै.‘पुढारी’तही याबाबतचे सविस्तर वृत्त मंगळवारी प्रसिद्ध झाले.

वाघनखांबाबत गेल्या 50 वर्षांपासून डॉ. जाधव पाठपुरावा करत आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर डॉ. जाधव यांनी वाघनखांबाबत मांडलेली वस्तुस्थिती आणि त्याबाबत दाखवलेले पुरावे यामुळे उत्साहाचे वातावरण असून वाघनखांबाबत दिलेल्या माहितीबद्दल डॉ. जाधव यांचे अभिनंदन करत असल्याचे शिवभक्तांनी सांगितले. ‘पुढारी न्यूज’ व दै. ‘पुढारी’तून प्रसिद्ध झालेले वृत्त पोस्ट करत अनेकांनी डॉ. जाधव यांचे अभिनंदन केले आहे.

Back to top button