

कोल्हापूर : जीप कंपनीने 'न्यू कंपास एसयूव्ही' भारतीय बाजारपेठेत 20.49 लाख रुपयांच्या सुरुवातीच्या एक्स-शोरूम किमतीत सादर केली आहे. या एसयूव्हीचे कोल्हापुरातील अॅरॉन व्हील्स येथे दै. 'पुढारी'चे चेअरमन व समूह संपादक डॉ. योगेश जाधव यांच्या हस्ते अनावरण झाले.
यावेळी अॅरॉन व्हील्सचे राजीव भिंगार्डे, हेमंत कुलकर्णी, अॅरॉन व्हील्सचे जनरल मॅनेजर विनायक शेंबडे आदी उपस्थित होते. या गाडीला 9-स्पीड एटी गिअरबॉक्स असून, तो केवळ भारतासाठी विकसित केला गेला आहे. शिवाय, दुसरा गिअरबॉक्स पर्याय 6-स्पीड मॅन्युअल आहे. जीपने या एसयूव्हीला 5 ट्रिम लेव्हल आणि 7 कलर पर्यायांमध्ये उपलब्ध केले आहे. हे 2.0 टर्बोचार्ज केलेले डिझेल इंजिन 170 बीएचपी आणि 350 एनएम टॉर्क निर्माण करते. या गाडीला 17.1 कि.मी. प्रतिलिटर इतके अॅव्हरेज पडत असल्याचा दावा कंपनीने केला आहे. जीप कंपास 9-स्पीड एटी 4 द2 आणि 4 द4 या दोन्ही पर्यायांमध्ये उपलब्ध आहे.
2024 जीप कंपासमध्ये ट्वीक केलेले फ्रंट ग्रिल, नवीन अलॉय व्हील डिझाईन आहे. या डणत च्या सस्पेन्शनमध्ये एक मोठा फेरबदल करण्यात आला आहे, गाडीला आता पूर्णपणे स्वतंत्र सस्पेंशन, फ्रिक्वेन्सी सिलेक्टिव्ह डॅम्पिंग आणि हायड्रॉलिक रिबाऊंड स्टॉप सिस्टीम अधिक अत्याधुनिक प्रवासाचा अनुभव देते. या गाडीला पॅनोरामिक सनरूफ, 10.1 इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, 10.2 इंच डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, एलईडी रिफ्लेक्टर हेडलॅम्प्स, पॉवर अॅडजस्टेबल ड्रायव्हर सीट आणि पॉवर अॅडजस्टेबल लंबर सपोर्ट, व्हेंटिलेटेड लेदर सीटस्, ड्युअल कंट्रोल, झोन सी अशा अनेक वैशिष्ट्यांसह कंपास पॅकेज आहे. पुश स्टार्ट/स्टॉप बटण, निष्क्रिय स्टार्ट/स्टॉप, वायरलेस ऍपल कारप्ले आणि अँड्रॉईड ऑटो, वायरलेस चार्जिंग अशा विविध फिचर्सचा गाडीमध्ये समावेश आहे.